अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ. पवार

खरीप, रब्बी असा फरक नको. सरसकट मका गुणवत्तेप्रमाणे खरेदी करावी. शेतकऱ्यांना खरिपाच्या तोंडावर दिलासा देण्यासाठी योग्य तो निर्णय तातडीने घ्या. - डॉ. भारती पवार, खासदार.
Buy corn unconditionally MP Dr. Bharti Pawar
Buy corn unconditionally MP Dr. Bharti Pawar

नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गत महाराष्ट्र राज्य सरकार केवळ रब्बी हंगामाच्या उत्पादित मक्याची खरेदी करणार आहे. परंतु, शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मकाही अजून शिल्लक आहे. त्यामुळे रब्बी तसेच खरीप हंगामात उत्पादित मक्याची एकत्रित खरेदी करावी, अशी उत्पादकांची मागणी आहे. त्यानुसार'रब्बी' शब्द काढा अन कुठल्याही अटीशर्तीविना मका खरेदी करा, अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचेकडे पत्राद्वारे केली.  

याबाबत दानवे यांच्याशी डॉ. पवार यांनी फोनद्वारेही संपर्क केला. शेतकऱ्यांची मका ही सरसकट खरेदी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार लवकरच यासंबंधीचे आदेश राज्य सरकारला दिले जातील, असे सांगण्यात आले. जिल्ह्यात मक्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे ही मका विना अट खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल.  प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना 

सध्या मक्याचे खरेदी करण्याचे हेक्टरी प्रमाण ३० क्विंटल आहे. ते ५० क्विंटल करावे, असा शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गौतम बलसाने, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी पांडव, उपनिबंधक मालेगाव संगमेश्वर बंगाळे, नांदगावचे सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे, येवल्याचे सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील आदी उपस्थित होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com