औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या उपोषण

water
water

औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्‍नासाठी भारतीय जनता पक्षातर्फे माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेतील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी (ता. २३) दिली. या उपोषणात माजी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. अशा आहेत मागण्या...

  • मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे
  • विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत  जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवावी
  • महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावेत 
  • कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करा
  • जायकवाडी धरणात पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी उपलब्ध करून कालव्याद्वारे सिंधफणा व वाण उपखोऱ्यांमध्ये सोडावे
  • कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प गतीने पूर्ण करावा
  • औरंगाबाद शहराची १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी. बीड जिल्ह्याचा आरक्षित पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवावा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com