नागवेलीचा खर्च निघणे झाले मुश्‍कील

गेल्या तीन महिन्यांपासून पानाचे दर कमी आहेत. पानांची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे मळ्याचा खर्चही निघेणा अशी अवस्था झाली आहे. - पोपट जाधव, पान उत्पादन शेतकरी,एरंडोली, ता. मिरज.
पानमळा
पानमळा

सांगली ः सांगली पूर्व भागातील मालगाव, बेडग, नरवाड ही गावे पानमळ्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. हा भाग पानमळ्याचे आगार मानले जाते. गेल्या तीन महिन्यांपासून पानाचे दर कमी झाल्याने पान उत्पादक शेतकरी संकटात असून नागवेलीचा खर्चही मिळणे मुश्‍कील झाले आहे.  मिरज पूर्व भागातील बागायती शेतीचा एकेकाळी "ब्रॅंड'' ठरलेली पानमळा शेती दिवसेंदिवस अस्तंगत होत आहे. चव आणि दर्जासाठी पूर्व भागाने राज्यभरातील पानबाजारांत ठसा उमटवला आहे. विशेषतः मालगाव, बेडग, आरग, नरवाड, भोसे, म्हैसाळ या गावांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. मालगावसारख्या गावाने कधीकाळी मुंबईच्या पानबाजाराची सूत्रे येथूनच हलवली. पानमळ्याच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी पानमळ्याखाली ८०० ते ९०० एकर क्षेत्र होते. आज ही शेती २०० ते २५०  एकरांवर आली आहे.  मागील चार वर्षांत पानाला चांगला भाव मिळाला. गेल्या वर्षी पानांना दोन हजार रुपये प्रतिडागास (एक डाग म्हणजे तीन हजार पाने) असा मिळाला होता. या वर्षी ३०० ते ६०० रुपये प्रतिडाग (एक डाग म्हणजे तीन हजार पाने) मिळत आहे. या भागात तीन कळी, फाफडा, हक्कल प्रकारच्या पानांची लागवड होते, परंतु वाढत्या खर्चामुळे पानमळ्याचे क्षेत्र घटले आहे. पानमळ्यात कुशल कामगार काम करण्यासाठी मिळत नाहीत. पानखुडणीसाठी जुने जाणते लोक जात आहेत. मात्र, कुशल कारागिरांची संख्या कमी असल्याने मजुरीत वाढ झाली आहे. त्यामुळे पानांची वेळेत काढणी होत नाही. याचाही फटका शेतील बसतो आहे.  पानाचे दर कळी    ३०० ते ४०० रुपये ३००० पाने हक्कल (मध्यम)    १०० ते १५० रुपये ३००० पाने फापडा    ५०० ते ६०० रुपये ३००० पाने

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com