रब्बी पेरणीत बीडची आघाडी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांपैकी रब्बी पेरणीत बीड जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ६१ हजार ६८८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली असून, त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात १ लाख ३० हजार ३६२ हेक्‍टरवर, तर औरंगाबाद जिल्ह्यात ९० हजार ८५७ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्‍यात ६१ हजार ८४५ हेक्‍टरवर झाली आहे. त्यापाठोपाठ अंबाजोगाई तालुक्‍यात ४१ हजार ४९३ हेक्‍टरवर, बीड तालुक्‍यात ३० हजार ६२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. पाटोदा तालुक्‍यात १८ हजार ८५ हेक्‍टरवर, गेवाराई तालुक्‍यात २३ हजार २४४, माजलगाव तालुक्‍यात २१ हजार ९२४, केज तालुक्‍यात २६ हजार २३, परळी तालुक्‍यात १७२९०, वडवणी तालुक्‍यात ४३८५, धारूर तालुक्‍यात २ हजार ९१२, तर शिरूर कासार तालुक्‍यात १४ हजार ४२५ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्‍यात सर्वाधिक २६ हजार २६३ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ जालना तालुक्‍यात २३ हजार ११४ हेक्‍टरवर, घनसावंगी तालुक्‍यात २० हजार ९३६ हेक्‍टरवर, बदनापूर तालुक्‍यात १६ हजार ००९ हेक्‍टरवर, परतूर तालुक्‍यात ११ हजार ४३१ हेक्‍टरवर, अंबड तालुक्‍यात १३ हजार ३०४ हेक्‍टरवर, भोकरदन तालुक्‍यात १० हजार ९७७ हेक्‍टरवर, तर जाफ्राबाद तालुक्‍यात ८ हजार ३२८ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात १५ हजार ८७७ हेक्‍टरवर पैठण तालुक्‍यात रब्बीची पेरणी झाली. औरंगाबाद तालुक्‍यात १३ हजार ३७२ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली. त्यापाठोपाठ खुल्ताबाद तालुक्‍यात ११ हजार ९५४ हेक्‍टरवर, गंगापूर तालुक्‍यात १६ हजार ७८७ हेक्‍टरवर, वैजापूर तालुक्‍यात ९ हजार ९७५ हेक्‍टरवर, कन्नड तालुक्‍यात ९ हजार १७३ हेक्‍टवर, सिल्लोड तालुक्‍यात १० हजार १०१ हेक्‍टरवर, फुलंब्री तालुक्‍यात २ हजार ८६२ हेक्‍टरवर, तर सोयगाव तालुक्‍यात ७५६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.

सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वात कमी पेरणी औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात केवळ १५ टक्‍के झाली. सर्वाधिक पेरणी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्‍यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अधिक रब्बीची पेरणी झाली आहे. औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांत यंदा ३ लाख ९२ हजार ९६९ हेक्‍टर रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र गृहीत आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ४८ हजार २२२ हेक्‍टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com