विद्युत अपघात टाळण्यासाठी सावध राहा : महावितरणचे आवाहन

विद्युत अपघात टाळण्यासाठी सावध राहा : महावितरणचे आवाहन
विद्युत अपघात टाळण्यासाठी सावध राहा : महावितरणचे आवाहन

नांदेड : पावसाळ्यात विद्युत अपघातामुळे जीवित व वित्तहानीच्या वाढत्या घटना ही चिंताजनक बाब आहे. विद्युत अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने घरात, शेतात विद्युत उपकरणे हाताळताना सावधानता बाळगावी. विद्युत उपकरणे, अर्थिंग, वायरिंग सुस्थितीत असल्याची खात्री परवानाधारक कंत्राटदारांकडून करून घ्यावी. विद्युत यंत्रणेतील विजेचे खांब, वीज तारा, रोहित्र (डीपी स्ट्रक्चर) व इतर उपकरणांना स्पर्श करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले.

वादळ वाऱ्यामुळे पावसाळ्यात विजेच्या तारा तुटणे, खांब वाकणे वा पडणे, रोहित्र वाकणे, पडणे, वीजतारांवर झाड, फांद्या पडणे, अशा घटना घडतात. पावसावेळी रोहित्र, खांबाजवळ, वीजतारांखाली थांबणे टाळावे. रोहित्र, वितरणपेटीला हात लावू नये, चालू स्थितीत घरातील पाण्याच्या मोटारीला स्पर्श करू नका, घरात ठिकठिकाणी जोड दिलेली वायर वापरू नका, कपडे वाळत घालण्यासाठी वीजसंवाहक तारेचा वापर करू नका, घरातील पाण्याची मोटार, पंखा, फ्रिज, कूलर, मिक्सर, इस्त्री, गिझर आदी विद्युत उपकरणे वेळोवेळी तपासून घ्या, असे आवाहन महावितरणने केले.

अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवा

घरात स्विच बोर्डाअगोदर ३० मिली ॲम्पिअर संवेदनेचा अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर (ELCB) बसवा. वायरिंगमध्ये दोष घरातील वीजपुरवठा लगेच बंद होतो. त्यामुळे जीवितहानी टळते. 

शेतात घ्या ही काळजी

जनावरे, गुरे-ढोरे विजेच्या खांबास, तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नये. शेतीपंपाला वीजपुरवठा करणारी, अर्थिंगची वायर ही अखंड असावी. शेतात ओल्या हाताने विजेचा पंप चालू, बंद करणे टाळावे. कंपनीने मान्यता न दिलेल्या उपकरणांचा (ऑटोस्टार्टर) उपयोग करून नये. शेतातील, घरातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी अर्थिंग फार महत्त्वाची आहे. अर्थिंग व वायरिंग सुस्थितीत असल्याची खात्री करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com