लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून देण्यात येणारा या वर्षीचा जमनालाल बजाज नैतिक उद्योग पुरस्कार रांजनी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर्स ॲण्ड अलाईडचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांना मुंबईत येथे नुकताच (ता.३) झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांचा विश्वास संपादन करून साखरे बरोबरच विविध उपपदार्थांची निर्मिती करून शेतकरी व कर्मचा-यांचे हीत जोपासण्याचा प्रयत्न ठोंबरे यांनी केला आहे. नॅचरल शुगरचा ‘नॅचरल परिवार’ तयार करून परिवारातील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंधित सर्वांना रोजगार उपलब्ध करून त्यांनी दिला आहे. साखर, दूध, स्टील, इथेनॉल, शेतीमाल साठवणेसाठी ग्रामीण भागात कोल्ड स्टोअरेज, रेशीम धागा निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, सामाजिक बांधिलकी म्हणून शैक्षणीक संस्था, ग्रामीण रूग्णालय, पतसंस्था, नॅचरल बझार असे विविध प्रकल्प एकाच छताखाली श्री. ठोंबरे यांनी राबवले आहेत. या बाबींची देशपातळीवर दखल घेऊन कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसेसकडून श्री. ठोंबरे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती बी. एन. श्रीकृष्णा व जे. के. उद्योग समुहाचे अनंत सिंघानिया यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
ग्राहक समाधान व संवाद, कर्मचारी प्रेरणा, पर्यावरण संरक्षण, पुरवठा साखळी प्रणाली, कायद्याचे व आचारसंहितेचे पालन, सामाजिक दायित्व या मुद्यांवर उद्योग, सेवा, व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय उद्योजकांना हा पुरस्कार दिला जात आहे. यापूर्वीही बी. बी. ठोंबरे यांना राज्य शासनाच्या कृषिरत्नसह विविध मानाचे ३५ पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.