केळी पीकविमा परतावा निकष बदलावे : अजित पवार

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी यंदा लागू केलेले निकष तातडीने बदला. याबाबत लवकर बैठक घ्या, अशा सूचनावजा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयातील वरिष्ठांना मंगळवारी (ता. १३) दिले. तसेच या प्रश्नी आपण सातत्याने पाठपुरावा करू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जळगावात दिले.
Banana crop insurance return criteria should be changed
Banana crop insurance return criteria should be changed

जळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी यंदा लागू केलेले निकष तातडीने बदला. याबाबत लवकर बैठक घ्या, अशा सूचनावजा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयातील वरिष्ठांना मंगळवारी (ता. १३) दिले. तसेच या प्रश्नी आपण सातत्याने  पाठपुरावा करू, अशी ग्वाही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना जळगावात दिले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईत केळी पिकासंबंधी परतावा निकष बदलावेत यासाठी मंत्रालयात मंगळवारी (ता. १३) उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. या शेतकऱ्यांमध्ये राहुल पाटील, विकास महाजन आदींचा समावेश होता. त्यात केळी पिकासाठी लागू केलेले निकष विमा कंपनीच्या फायद्याचे व शेतकऱ्यांना लाभ न मिळू देणारे असल्याचे मुद्दे श्री. पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

या योजनेसंबंधी विमा हप्ते स्वीकारण्याचे काम १५ ऑक्टोबरपासून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. त्यापूर्वीच हे निकष बदलले गेल्यास चांगला फायदा होईल, अशी मागणीदेखील शेतकऱ्यांनी केली. यावर पवार यांनी लागलीच मोबाईलद्वारे कृषी मंत्रालयातील वरिष्ठांशी संवाद साधला. त्यात हे निकष बदला व लवकर यावर बैठक घ्या, अशा सूचना दिल्या. पण मंत्रालयातील वरिष्ठांनी हे निकष आता पुढील वर्षी बदलता येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर पवार यांनी शेतकरी हितासंबंधी कार्यवाही करा, असे अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती शेतकरी राहुल पाटील यांनी दिली.

जळगावात फडणवीस यांची भेट केळी पिकासंबंधी विमा योजनेत राज्य शासनाने लागू केलेल्या निकषासंबंधी जळगाव येथील विमानतळावर केळी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष भागवत पाटील, सत्वशील पाटील आदींनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात केळी उत्पादकांची साथ देणाऱ्या पक्षालाच किंवा नेत्याला केळी उत्पादक पुढे मदत करतील, साथ देतील, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यावर फडणवीस यांनी मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. पुढेही यासंदर्भात प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. फडणवीस मंगळवारी जामनेर (जि. जळगाव) येथे आमदार गिरीश महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी आले होते. यानिमित्त केळी उत्पादकांनी फडणवीस यांची भेट घेतली. तसेच जामनेर येथे फडणवीस व आमदार महाजन यांची मुक्ताईनगर तालुक्यातील केळी उत्पादकांनीदेखील याप्रश्नी भेट घेतल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com