किटकनाशकांचा अतिवापर टाळावा ः घाडगे

पुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा पिकांवर अविवेकी व वारेमाप वापर करणे टाळावे,’’, असे आवाहन ‘आत्मा’चे उप-प्रकल्प संचालक सुभाष घाडगे यांनी केले.
Avoid overuse of pesticides: Ghadge
Avoid overuse of pesticides: Ghadge

पुणे : ‘‘खरीप हंगामात पिकांवर रोग किडीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा पिकांवर अविवेकी व वारेमाप वापर करणे टाळावे. किटकनाशकांची हाताळणी साठवणूक व वापर कसा करावा हे तज्ञांकडून माहिती करून घ्यावी’’, असे आवाहन ‘आत्मा’चे उप-प्रकल्प संचालक सुभाष घाडगे यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विज्ञान केंद्र बारामतीतर्फे मका पिकावरील फवारणी करणाऱ्या शेतमजुरांसाठी कौशल्याधारित दोन दिवशीय प्रशिक्षण बुधवारी (ता. ५) व गुरूवारी (ता. ६) झाले. पुरंदर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मिलिंद टोणपे, तालुका कृषि अधिकारी अंकुश बर्डे,  तुषार डावखर, ‘आत्मा’चे तालुका व्यवस्थापक गणेश जाधव, स्मिता वर्पे आदी उपस्थित होते. 

बारामती कृषी विज्ञान केंद्राचे भाजीपाला गुणवत्ता केंद्राचे समन्वयक संदीप बाबर म्हणाले, ``शेतकऱ्यांना मका पिकांसाठी कोणकोणत्या प्रकारची किटकनाशके वापरावीत व कोणत्या प्रकारची वापरू नयेत, यांची सविस्तरपणे तज्ञांकडून माहिती घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या बॉटलवरील माहिती वाचावी आणि त्यांच्यासोबत येणारे विविध माहितीपत्रक वाचून त्याप्रमाणे काळजी घ्यावी. किटकनाशकांची सरमिसळ करून फवारणी टाळावी. किडीच्या प्रादुर्भावानुसार फवारणी यंत्र व नोझलची निवड करावी. यंत्रे सुट्टे भाग, इंजिन पंप, फवारणी यंत्राची निगा व देखभाल, कीटकनाशकांचा नेमका व सुरक्षित वापर करण्याची पद्धत व याकरिता घ्यावयाची काळजी घ्यावी.’’ 

समन्वयक प्रशांत गावडे म्हणाले, ‘‘फवारणी करताना मधमाशांची काळजी घेताना शेतकऱ्यांनी फवारणी संदर्भात तज्ञांचे म्हणणे एकावे. त्याच प्रमाणे काळजी घ्यावी.’’ गणेश जाधव यांनी प्रास्तविक केले. तर, वर्पे यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com