अंजनगाव सुर्जीत कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव

थंडीत वाढ झाल्याने राज्यात काही भागांत कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी शेतात फेरोमोन ट्रॅपचा वापर शिफारसीप्रमाणे करावा. त्याआधारे बोंड अळीची लक्षणे जाणता येतात. - डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
अंजनगाव सुर्जीत कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव
अंजनगाव सुर्जीत कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव

अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती : अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे खोडव्याच्या (फरदड) कपाशीवर बोंड अळीने पुन्हा डोके वर काढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. कापूस दरातील वाढीच्या परिणामी शेतकऱ्यांनी कपाशीची फरदड घेण्यावर भर दिला आहे.

हंगामाच्या सुरवातीला कापूस संशोधन केंद्र तसेच कृषी विभाग, कृषी विद्यापीठाकडून शिफारसीत उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर शेतकऱ्यांनी भर दिला. त्यामुळे सुरवातीला कपाशीवर बोंड अळीचा जास्त प्रादुर्भाव झाला नाही. आता कापूस दर ५८५० ते ६००० रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. कापूस उत्पादनातून या वर्षी चांगला फायदा होईल, हे नजरेसमोर ठेवत शेतकऱ्यांनी कपाशीला पाणी देत फरदड घेण्यास सुरवात केली आहे. त्यातच थंडीदेखील वाढल्याने हे सारे वातावरण बोंड अळीसाठी पोषक ठरले आहे. परिणामी सुर्जी, हंतोडा, मलकापूर, कापूसतळणी या भागात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. कृषी विभागानेदेखील शेतकऱ्यांना कपाशीचा खोडवा (फरदड) न घेण्याचे आवाहन केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com