परभणी ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेअंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांनी थकित वेतनासह अन्य मागण्यांसाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्या कक्षात शुक्रवारी (ता. १३) ठिय्या आंदोलन केले. दोन महिन्यांचा पगार देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील गटसचिवांचे जानेवारी २०१५ ते मार्च २०१८ पर्यंतचे वेतन तत्काळ अदा करण्यात यावे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून गटसचिवांच्या वेतनासाठी २ टक्के निधी द्यावा, संस्था सक्षमीकरणासाठीचा एक टक्का निधी गटसचिवांच्या थकित वेतनासाठी द्यावा, गटसचिवांना उपदान योजना तत्काळ लागू करावीआदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठवड्यात उपोषण केले होते. परंतु त्यानंतरही मागण्यांसंदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे परभणी हिंगोली जिल्हा गटसचिव कर्मचारी संघटने(लालबावटा)चे अध्यक्ष राजन क्षीरसागर, सरचिटणीस नवनाथ कोल्हे आदींनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी) संस्था यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.