पडीक जमीन विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची योजना आदर्शवत

ओरोस, जि. सिंधुदुर्ग ः शरद पवार यांच्या हस्ते पडीक जमीन विकास कर्ज योजनेचा शुभारंभ झाला. सोबत सतीश सावंत, सुनील तटकरे आदी.
ओरोस, जि. सिंधुदुर्ग ः शरद पवार यांच्या हस्ते पडीक जमीन विकास कर्ज योजनेचा शुभारंभ झाला. सोबत सतीश सावंत, सुनील तटकरे आदी.

कणकवली, जि. सिंधुदुर्ग  ः सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आर्थिक मंदीच्या काळात एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले, हे काम कौतुकास्पद आहे. बॅंकेने जिल्ह्याच्या शेती आणि बागायती क्षेत्राला बळ देण्यासाठी पडीक जमीन विकास कर्ज योजनेसाठी उचललेले पाऊल सहकारासाठी आदर्शवत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य कार्यालयाला श्री. पवार यांनी रविवारी भेट दिली. या वेळी सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, अबीद नाईक, व्हिक्‍टर डान्टस आदी उपस्थित होते. या वेळी श्री. पवार यांच्या हस्ते पडीक जमीन विकास कर्ज योजनेचा शुभारंभही झाला. 

ते म्हणाले, "सिंधुदुर्गात शेती बागायती विकसित होत आहे. या जिल्ह्यातील पडीक जमिनीचा विकास झाला तर खऱ्या अर्थाने आर्थिक नांदी होणार आहेत. पडीक जमिनीवर काजू व बांबूची लागवड बॅंकेच्या माध्यमातून सुरू झाल्यास येथील जमीनदारांच्या हातात चार पैसे येतील. बड्या कर्जदारांच्या फसवणुकीमुळे राष्ट्रीय बॅंका अडचणीत आल्या असताना सिंधुदुर्ग बॅंकेने राखलेली पत अभिमानास्पद आहे. या जिल्ह्यातील शेतकरी प्रामाणिक आहेत. कर्ज परतफेडही करतात. या जिल्ह्यात फलोद्यान योजनेमुळे चित्र बदलले आहे. या योजनेला नवे रूप देण्याची गरज आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com