पंजाब, हरियानात शेती कामांना सुरुवात; काही नियम पाळणे आवश्‍यकच

चंडीगड : भारतातील गव्हाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या पंजाब आणि हरियाना या राज्यांमध्ये गव्हाच्या कापणीला १५ एप्रिलपासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे दोन्ही राज्यांनी जाहीर केले आहे.
पंजाब, हरियानात शेती कामांना सुरुवात; काही नियम पाळणे आवश्‍यकच
पंजाब, हरियानात शेती कामांना सुरुवात; काही नियम पाळणे आवश्‍यकच

चंडीगड : भारतातील गव्हाचे कोठार म्हणून ओळखले जाणाऱ्या पंजाब आणि हरियाना या राज्यांमध्ये गव्हाच्या कापणीला १५ एप्रिलपासून सुरुवात करण्यात येणार असल्याचे दोन्ही राज्यांनी जाहीर केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाउन नंतरची ही पहिलीच आर्थिक घडामोड ठरणार असणार आहे. पंजाबमध्ये १५ एप्रिलपासून, तर हरयाणामध्ये २० एप्रिलपासून गहू पिकाच्या कापणीला सुरुवात केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेल्या गव्हाच्या खरेदीबाबत अनिश्चितता असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली. त्यामुळे पंजाबने कठोर टाळेबंदीचे नियम शिथिल करण्याची घोषणा केली आहे. गव्हाचे पीक कापणीस तयार आहे. मात्र, लॉकडाउनमुळे शेतकऱ्यांना ना मजूर मिळत आहेत ना गहू कापणीची मशीन. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने लॉकडाउनच्या नियमांमध्ये प्रशासनाने शिथिलता आणत शेतांमधील कामांना सूट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, शेतीची कामे करताना काही नियम पाळणे आवश्‍यक करण्यात आले आहे. मास्क घालणे अनिवार्य गावकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क घालणे अनिवार्य असून पीक काढणीच्या प्रक्रियेसाठी सामाजिक अंतराच्या निकषांची खात्री करुनच बाजारपेठेत प्रवेश दिला जाणार आहे. मोबाईलद्वारे सूचना पंजाब आणि हरयाणामध्ये जवळपास २० लाख लोक शेती आणि काढणीच्या कामांमध्ये सहभागी होत असते. त्यामुळे शेतीची कामे करताना सामाजिक अंतराचे निकष पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून याबाबत मोबाईल अलर्टद्वारे सातत्याने सूचना करण्यात येणार आहेत. केवळ ५० शेतकऱ्यांनाच प्रवेश बाजारात एका वेळी केवळ ५० शेतकऱ्यांनाच प्रवेशाची मुभा दिली जाणार असून सकाळी ८ ते २ आणि दुपारी २.३० ते ६ या वेळेतच बाजार भरवला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच शेतकऱ्यांना दररोज वेळापत्रकाविषयी माहिती देण्यात येईल. त्यानुसार सर्व बाजार प्रशासकांना मास्क, सॅनिटायझर्स, साबण आणि पाण्याच्या उपलब्धतेची सुनिश्चितता करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com