कृषी पदवीधरांनी ग्रामीण विकासासाठी कार्य करावे ः माजी कुलगुरू डाॅ. साळी

कृषी पदवीधरांनी ग्रामीण विकासासाठी कार्य करावे
कृषी पदवीधरांनी ग्रामीण विकासासाठी कार्य करावे

पुणे ः कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, कृषीचे ज्ञान, प्रशासन यातील अनुभवाचा उत्तम संगम आहे. याद्वारे शासन आणि शेतकरी समाज तसेच ग्रामीण भाग यांचा चांगला समन्वय होऊन महात्मा गांधीचे ग्रामीण विकासाचे स्वप्न उत्तमप्रकारे साकार होऊ शकते. त्यासाठी या अनुभवी प्रशासकीय व शास्त्रज्ञ मंडळींनी ग्रामीण विकासासाठी झोकून देऊन कार्य करण्याची गरज आहे, असे मत माजी कुलगुरू डाॅ. प्रतापराव साळी यांनी व्यक्त केले. 

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३१ वा वर्धापन दिनानिमित्त कृषी पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (ता. १) शिवाजीनगर येथील द डेक्कन शूगर टेक्नाॅलाॅजिस्ट असोसिएशन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. अशोक पवार, कार्यकारी अध्यक्ष डाॅ. बळवंतराव जगताप, माजी कृषी आयुक्त विकास देशमुख, सचिव डाॅ. जनार्दन कदम, खजिनदार डाॅ. पांडुरंग पाटील, सरचिटणीस डाँ. वि्ठ्ठल शिर्के, सदस्य प्रा. के. बी. कांबळे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, चंद्रकांत दळवी, विजय कोलते, माजी कुलगुरू राजाराम देशमुख, बाळासाहेब वाघ यांच्यासह माजी विद्यार्थी आदि उपस्थित होते. 

यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना कृषी सन्मान, कृषी शास्त्रज्ञ डाॅ. ज्ञानदेव हापसे यांना कृषी अभिमान, उद्योजक फरोख कूपर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख म्हणाले की, ‘‘शेतकऱ्यांचे जसे शेतीशी नाते असते, तसे विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाशी नाते असते. शेतकरी हा काळ्या आईची सेवा करतो, ही कृतज्ञता आहे. शेतीत बदल करण्यासाठी क्षमता ही फक्त कृषी पदवीधरामध्ये आहे. शेतीमध्ये आज गटशेतीची संकल्पना पुढे येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून पुढील काळात गटशेतीचे माध्यम आपण स्विरकाले पाहिजे. शेतीबरोबर जोडधंद्याची जोड दिल्याशिवाय शेतीचा विकास होऊ शकणार नाही. 

माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले की, ‘‘आम्ही लोकसहभागातून आमच्या गावाचा सर्वांगिण विकास केला आहे. यामध्ये जलसंधारण, ग्रामीण विकास नागरी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आमचे गाव हे राज्यपातळीवर पुढे येत आहे. गावाचा झालेला विकास पाहून इतरही गावे पुढे येण्याचा प्रयत्न करू लागली आहेत.’’ कार्यक्रमात कार्याध्यक्ष बी. के. जगताप यांनी प्रास्तविक केले. तर जी. आर कदम यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com