ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्प

दमदार पावसामुळे येथील आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे शिरपूरकरांच्या पाण्याची चिंता तर मिटलीच शिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.
The Adol project is flowing
The Adol project is flowing

शिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे शिरपूरकरांच्या पाण्याची चिंता तर मिटलीच शिवाय शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

वाशीम जिल्ह्यातील शिरपूरसह, रिसोड, रिठद या गावांना पाणीपुरवठा करणारा आडोळ प्रकल्प गेल्या दोन महिन्यांतील दमदार पावसामुळे तुडुंब भरला आहे. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. प्रकल्प तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचाही प्रश्न मिटण्याची चिन्हे आहेत.

यावर्षी जून महिन्यापासूनच शिरपूर व परिसरात जोरदार पाऊस होत आलेला आहे. त्यामुळे विविध नाल्यांना पूर येऊन  प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात पाणी मिळाले. केवळ दोन महिन्यांच्या कालावधीतच हा प्रकल्प तुडुंब भरला आहे. शिरपूरसह रिसोड या शहराला तसेच रिठदला देखील याच प्रकल्पाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे त्यांचाही या वर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. आडोळ प्रकल्प हा पाण्याच्या साठवणीच्या बाबतीत मोठा आहे. हा प्रकल्प पूर्ण भरल्याने यंदा रब्बीत पिकांनाही पाणी मिळू शकणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com