कर्मचाऱ्यांनी विनापरनवागी मुख्यालय सोडल्यास कारवाई

कर्मचाऱ्यांनी विनापरनवागी मुख्यालय सोडल्यास कारवाई

मुंबई : लोकप्रतिनिधींनीच्या गावपातळीवर भेटी होत असताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत, या तक्रारीची दखल घेऊन कृषी आयुक्तांनी आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही विनापरवानगी मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासकीय आणि शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.  नुकत्याच झालेल्या यवतमाळ फवारणीच्या दुर्घटनेची गंभीर दखल शासन पातळीवर घेण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी दौऱ्यावर असताना कृषीचे अधिकारी आणि कर्मचारी भेटत नसल्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवून उत्पन्नात वाढ करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. परंतु क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आणि अडचणी शासनापर्यंत पोचवणेही कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आवश्यक असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाणे, खते आणि शेतमालचे उत्पादन आणि विक्रीसाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. विभाग, जिल्हा, तालुका, मंडळ आणि गावपातळीवर कृषीचे अधिकारी कर्मचारी मुख्यालय सोडून वैयक्तिक कामासाठी जातात किंवा मुख्यालयी राहत नाहीत, अशांवर कारवाईचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. सर्व कृषी संचालक, सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांना सार्वजनिक सुटीच्या दिवशी मुख्यालय सोडण्यासाठी कृषी आयुक्तांची परवानगी लागणार आहे. कृषी आयुक्तालयातील कृषी अधिकारी, उपसंचालक यांना कृषी उपसंचालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे.  उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी उपसंचालकांनी संबंधित जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांची, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांना उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांना तालुका कृषी अधिकाऱ्यांची परवागी घेऊनच मुख्यालय सोडता येणार आहे. यापुढे विनापरवागी मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com