कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर होणार कारवाई ः नवाल

कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर होणार कारवाई  ः नवाल
कर्जास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांवर होणार कारवाई ः नवाल

अमरावतीः पात्र व्यक्‍तीला कर्ज न दिल्यास किंवा टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यास बॅंकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी (ता. ७) दिला. जिल्ह्यातील पीककर्ज वितरणाच्या आढाव्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंका यांची आढावा सभा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव व विविध बॅंकांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. शैलेश नवाल म्हणाले, की अलाहाबाद बॅंकेचे कर्जवाटप अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यांच्याबद्दल तक्रारीही प्राप्त होत आहेत. त्यामुळे या कामात सुधारणा करावी व पात्र शेतकरी बांधवांना तत्काळ कर्जवितरण करावे. ज्या बॅंका या कामात टाळाटाळ किंवा हयगय करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कर्जमाफीसंबंधी तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ज्या पात्र व्यक्‍तीला अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही किंवा कर्जमाफी होऊनही कर्जवाटप झालेले नाही, अशा सभासदांनी तत्काळ तालुकास्तरीय समितीकड संपर्क साधून तक्रार अर्ज सादर करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com