लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१ उमेदवारांचे अर्ज

लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१ उमेदवारांचे अर्ज
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१ उमेदवारांचे अर्ज

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १७ मतदारसंघापैकी १५ मतदारसंघात एकूण ४८ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यंत १६ मतदारसंघात ७१ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. शुक्रवारी लोकसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सुरवातीच्या दिवसापासून नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील ८- वर्धा लोकसभा मतदारसंघात ५ (६), ९- रामटेक मतदारसंघ २ (२), १०- नागपूर मतदारसंघ ९ (१२), ११- भंडारा- गोंदिया मतदारसंघ ४ (६), १२- गडचिरोली- चिमूर मतदारसंघ ४ (४), १३- चंद्रपूर मतदारसंघात १ (२) आणि १४- यवतमाळ- वाशीम मतदारसंघात ७ (११) उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात आतापर्यंत नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. ५- बुलढाणा मतदार संघ १ (१), ६- अकोला १ (२), ७- अमरावती १ (५), १५- हिंगोली २ (२), १६- नांदेड ७ (११), १७- परभणी १(३), ३९- बीड १ (१), ४०- उस्मानाबाद मतदारसंघात आज रोजी तसेच आजपर्यंत २ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. ४२- सोलापूर मतदारसंघात शुक्रवारी नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसले तरी आजपर्यंत एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com