नाशिक परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी ६७७७ अर्ज

नाशिक परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी ६७७७ अर्ज
नाशिक परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी ६७७७ अर्ज

नाशिक : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला नाशिक परिमंडळात मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत साडेसहा हजारांपेक्षा अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील जवळपास साडेचार हजार अर्ज पात्र ठरले असल्याची माहिती मिळाली.  

लाभार्थी हिश्श्याची रक्कम भरलेल्या १०४८ शेतकऱ्यांच्या शिवारात सौरपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा मिळावा, वाणिजिक्य व औद्योगिक ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा भार कमी करणे, सिंचन क्षेत्राला सबसिडीच्या बोजातून मुक्ती मिळावी, ऊर्जेच्या स्वच्छ व अक्षय इंधन स्राेताच्या वापरातून पर्यावरणाचे हित साधणे आदीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांना ९०% अनुदानातून ३ व ५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप या योजनेतून मिळणार आहेत. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले.

शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य व्हावे, पारंपरिक पद्धतीने कृषिपंप जोडणीसाठी लागणाऱ्या खर्चात बचतीचे उद्दिष्ट साध्य व्हावे, कृषी वापरासाठी पारेषण विरहित एक लाख सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आहे. लाभार्थ्यांना या योजनेतून सौर कृषिपंपासोबत आर्थिक भाराशिवाय दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट मिळणार आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/solar या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले. 

कोटेशन देण्याची प्रक्रिया सुरू 

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी नाशिक परिमंडळातील ६७७७ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील ४३६७, तर नगर जिल्ह्यातील २४१० शेतकऱ्यांचा समावेश आहे. जलदपणे प्रक्रिया राबविताना २१७८ अर्जदारांना कोटेशन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. १०४८ शेतकऱ्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून लाभार्थी हिश्श्याची रक्कम भरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com