नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात येणाऱ्या वनस्पतींचा वापर जनावरांच्या खाद्यात जास्त प्रमाणात झाल्याने नायट्रेटची विषबाधा होऊन जिल्ह्यात आत्तापर्यंत ४२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. या वनस्पतींचे खोड आणि मुळामध्ये नायट्रेटचे प्रमाण असते. त्यामुळे ही जनावरे जनावरे दगावली असल्याचे जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर, नगर, नेवासे आणि पारनेर तालुक्यातील जनावरांचा यात समावेश आहे. पशूसंवर्धन विभागाने वेळीच उपचार केल्याने या विषवाधेतून सुमारे शंभर जनावरे वाचली आहेत. पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात कुंद्रा (कुंदुरचा, कुंजीर), माठ (रानमाठ, काटेमाठ), रताळे भाजी, केणा, ढोल आंबा, कोंबडा गवत या सारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढतात. या वनस्पतीचे खोड आणि मुळामध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असते. काही शेतकरी कोवळ्या गवतासोबत या वनस्पती पूर्णपणे उपटून जनावरांना चारा म्हणून वापरतात. त्यामुळे यातील नायट्रेटची वीषबाधा होऊन जनावरे दगावत असल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला. नगर तालुक्यातील वडगाव तांदळी, राळेगण, आंबिलवाडी येथील आठ जनावरे, पाथर्डी तालुक्यातील चारा छावणीतील एक जनावर, नेवासे तालुक्यातील कुकाणा येथील सात जनावरे, कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे पाच, राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील एक जनावर, संगमनेर तालुक्यातील नऊ जनावरे, पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद, बांबुर्डी, चौंभूत येथील तीन अशी आत्तापर्यंत एकूण ४२ जनावरे नायट्रेटचा अंश असलेल्या वनस्पती खाल्ल्याने दगावल्याचे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील पशूतज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने जवळपास १०० जनावरे बचावली आहेत. पशूपालकांनी नायट्रेटचे प्रमाण जास्त असलेल्या वनस्पती खोड, मुळासकट जनावरांच्या आहारात देऊ नयेत, यासाठी पशूसंवर्धन विभागाकडून जागृती केली जात आहे. कशामुळे होते विषबाधा : बांधावर येणाऱ्या कुंजीर, रानमाठ, रताळे भाजी, केणा, ढोल आंबा या वनस्पतींचे खोड आणि मुळात नायट्रेटचे प्रमाण असते. त्यामानाने पानांमध्ये कमी असते. या वनस्पती जास्त प्रमाणात जनावरांच्या आहारात आल्यातील त्यातील नायट्रेट रक्तात जलद गतीने शोषले जाते. त्यामुळे ऑक्सिजन वाहून नेण्याची रक्ताची क्षमता कमी होते. परिणामी हृदय व फुप्फुसे निकामी होऊन जनावरांचा मृत्यू होतो. असे करा उपचार
विषबाधेची लक्षणे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.