परभणी जिल्ह्यात कापसाची ३६ लाख क्विंटल खरेदी

कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी जिल्ह्यातील सन २०१९-२० चा कापूस खरेदी हंगाम बुधवारी (ता.५) समाप्त झाला.
cotton procurement
cotton procurement

परभणी ः कोरोना साथीमुळे लांबत गेलेला परभणी जिल्ह्यातील सन २०१९-२० चा कापूस खरेदी हंगाम बुधवारी (ता.५) समाप्त झाला. यंदा जिल्ह्यात कापूस राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन), भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक, कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील व्यापारी यांनी कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतर मिळून एकूण १ लाख  ५९ हजार ४४५ शेतकऱ्यांच्या ३६ लाख ७७ हजार ५४९ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून हमीभावानुसार या कापसाची किंमत १ हजार २२८ कोटी २२ लाख रुपये होते अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे यांनी दिली. कोरोना साथीमुळे लॉकडाऊन सुरु करण्यात आल्यानंतर खुल्या बाजारातील कापसाच्या दरात मोठी घसरण झाली होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी पणन महासंघ आणि सीसीआयच्या खरेदी केंद्रावर हमीभावाने कापूस विक्रीसाठी प्राधान्य दिले.गर्दी टाळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शेतकरी नोंदणी करण्यात  आली होती. सीसीआयतर्फे जिंतूर, सेलू, मानवत, सोनपेठ,पूर्णा, ताडकळस या सहा खरेदी केंद्रावर १० हजार ६७ शेतकऱ्यांच्या २ लाख ५७ हजार ६४.४० क्विंटल आणि फेडरेशनच्या परभणी, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या चार केंद्रांवर १५ हजार ११७ शेतकऱ्यांच्या ४ लाख ६६ हजार ९९४.९२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. खाजगी बाजारांत  ६ हजार ९०४ शेतकऱ्यांच्या ८२ हजार १.१० क्विंटल, बाजार समित्यांमधील व्यापाऱ्याकडून १८ हजार ४०७ शेतकऱ्यांच्या २ लाख ६० हजार ५७५.९० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कोरोनापू्र्वी १लाख ८ हजार ९४३ शेतकऱ्यांच्या २६ लाख १० हजार ८८९.२१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली तर कोरोनानंतर ५० हजार ५०२ शेतकऱ्यांच्या १० लाख ६६ हजार ६६०.३२ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच जिनिंग उद्योजकांनी मान्सून शेडची उभारणी केली त्यामुळे पावसाळ्यात देखील शेतक-यांच्या कापसाची खरेदी करणे शक्य झाले. सीसीआय कडून ७१२ कोटी ७१ कोटी रुपयाची आणि पणन महासंघाकडून ५१५ कोटी ५० कोटी रुपये  मिळून १ हजार २२८ कोटी २२ लाख रुपयांची कापूस खरेदी करण्यात आलेली आहे.कोरोनासाथीमध्ये जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर,विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खरेदी प्रक्रियेतील सर्व यंत्रणांमधील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांच्या सहकार्यामुळे यंदा विक्रमी कापूस खरेदी झाली असे सुरवसे यांनी सांगितले.

खरेदीदार निहाय एकूण कापूस खरेदी स्थिती (क्विंंटलमध्ये)

खरेदीदार  कापूस  शेतकरी संख्या
पणन महासंघ   ९४५६६०   ३१३१९
सीसीआय   १२९३४४२ ५४६४५
खाजगी बाजार ५१४५२७   २४७४०
थेट पणन परवानाधारक ३२२   ३२
बाजार समित्यांतील व्यापारी ९२३५९७   ४८७०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com