PM_kisan
PM_kisan

'सन्मान निधी'चे २०९६ कोटी अडकले

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा नोकरदारांसह एकाच कुटुंबातील पती-पत्नीलाही लाभ मिळाला. त्यामुळे आता योजनेतील खात्यांची पडताळणी केली जाणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे यंदाचे २०९६ कोटी रुपये केंद्र सरकारकडे तूर्ततरी अडकले आहेत.

सोलापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत गेल्या वर्षी फेब्रुवारी २०१९ मध्ये राज्यातील ८९ लाख ३० हजार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात एक हजार ७८५ कोटी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ता (प्रत्येकी दोन हजारांप्रमाणे) वितरित झाला. मात्र, या घाईगडबडीत नोकरदारांसह एकाच कुटुंबातील पती-पत्नीलाही योजनेचा लाभ मिळाला. त्यामुळे आता योजनेतील खात्यांची पडताळणी केली जाणार असल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे यंदाचे २०९६ कोटी रुपये केंद्र सरकारकडे तूर्ततरी अडकले आहेत. शेतकरी सन्मान निधीअंतर्गत राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली. मोठा गाजावाजा करीत मोदी सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये ८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारांचा पहिला हप्ता जमा केला. मात्र, घाईगडबडीत सुरू केलेल्या योजनेत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता दरवर्षी योजनेतील पाच टक्‍के खात्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षात राज्यातील ६० लाख शेतकऱ्यांचे दोन हजार ९६ कोटी ४० लाखांची रक्‍कम केंद्र सरकारकडून प्राप्त न झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. २०२०-२१ या वर्षात दोन हजारांचा पहिला हप्ता ६० लाख ८८ हजार शेतकऱ्यांना तर ३१ लाख ९१ हजार शेतकऱ्यांनाच दुसरा हप्ता मिळाला आहे. अद्याप केंद्र सरकारकडून २०९६ कोटी रुपये मिळालेले नाहीत.

वर्ष २०१९-२०​ योजनेंतर्गत निधीचे वितरण

हप्ता   शेतकरी  निधी (कोटींत)
पहिला ८९.३० लाख  १,७८५.९१ 
दुसरा ८८.०४ लाख १,७६०.८९
तिसरा    ७१.५३ लाख   १,४३०.६२

      वर्ष २०२०-२१ वर्ष २०१९-२०​ योजनेंतर्गत निधीचे वितरण (३०/६/२०२० अखेर)

पहिला ६०.८८ लाख १२१७.६२
दुसरा    ३१.९१ लाख  ६३८.१४

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. योजनेच्या प्रारंभीa राज्यातील ८९ लाख ३० हजार शेतकऱ्यांना एक हजार ७८५ कोटी ९१ लाखांचा पहिला हप्ता वितरित झाला. परंतु, त्यामध्ये नोकरदार शेतकरी, एकाच कुटुंबात पत्नी-पत्नीला पैसे मिळाले आहेत. आता दरवर्षी पाच टक्‍के खात्यांची पडताळणी केली जाणार असून, चुकीच्या पद्धतीने पैसे मिळालेल्यांकडून सदर रक्‍कम वसूल केली जाणार आहे. - जयंत टेकाळे, उपायुक्‍त, कृषी गणना विभाग, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com