सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे रिक्त

agricultural department
agricultural department

सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी तब्बल १०७ पदे रिक्त आहे. यामध्ये जिल्हा कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकाऱ्यांची ६ पदाचा समावेश आहे. त्यामुळे न पेलवणारा भार तालुका अधिकाऱ्यांकडे दिला जात आहे. कृषी विभागातील रिक्त पदामुळे शासनाच्या विविध कृषी आणि कृषिपूरक योजना पुरविणारी यंत्रणाच कमकुवत झाल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्याचा कृषी विभाग सध्या रिक्त पदामुळे हैराण झाला आहे. जिल्ह्यातील १०७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा अधीक्षक पद देखील रिक्त आहे. याशिवाय ८ तालुका कृषी अधिकाऱ्यांपैकी दोन पदे भरलेली आहेत. रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे दिला जात असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. कृषी विभागाच्या विविध योजनांसह कीडरोग नियत्रंण, नियोजनबद्ध विविध पिकांची लागवड करण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना मदत होत असते. जिल्ह्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे काजू, आंबा, पिकांसह अन्य पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशावेळी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असते. परंतु कर्मचारी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार कोण हा खरा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गावागावातील शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याचे काम कृषी सहाय्यक करीत असतात. परंतु जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांची ५२ पदे रिक्त आहेत. तर कृषी पर्यवेक्षकांची २४ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही ससेहोलपट आहे. सिंधुदुर्गात कृषी विभागाच्या योजनांसह चांदा ते बांदा या योजनेतून कृषी आणि कृषी संलग्न योजना राबविल्या जात आहेत.परंतु अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे ही योजना राबविण्यात देखील अडचणी येत आहेत. वर्गनिहाय रिक्त पदे

पदनाम  मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पद
जिल्हा कृषी अधीक्षक  १    ०   १
तालुका कृषी अधिकारी ८   ६   २
कृषी अधिकारी १२   १    ११
मंडलकृषी अधिकारी  १९   ६   १३    
कृषी पर्यवेक्षक ५६   ३२     २४  
 कृषी सहाय्यक २४९   १९७   ५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com