मराठवाड्यात ११ महिन्यांत १ हजार ६३८ टन कोष उत्पादन

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १ एप्रिल २०१९ ते ३ मार्च २०२० दरम्यान वर्षभरात १ हजार ६३८.३४७ टन कोषाचे उत्पादन झाले.
1 thousand 638 tons of sericulture production in 11 months in Marathwada
1 thousand 638 tons of sericulture production in 11 months in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १ एप्रिल २०१९ ते ३ मार्च २०२० दरम्यान वर्षभरात १ हजार ६३८.३४७ टन कोषाचे उत्पादन झाले. 

मराठवाड्यात ३१ मार्च २०१९ अखेरपर्यंत ६ हजार ९०० शेतकऱ्यांनी ७४२० एकरवर तुती लागवड केली होती. त्यानंतर २९१२ शेतकऱ्यांनी २९८६ एकरवर तुती लागवड केली. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण तुतीचे क्षेत्र ९८१२ शेतकऱ्यांकडील १० हजार ४०६ एकर इतके झाले होते. तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना २५ लाख ५० हजार ३५० अंडीपुंजचे वाटप केले. त्यातून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी १६३८ मेट्रिक टन रेशीम कोषाचे उत्पादन केल्याची माहिती विभागातर्फे देण्यात आली. 

जिल्हानिहाय तुती क्षेत्र (एकरमध्ये) 

औरंगाबाद १७००
जालना १०७६
परभणी ८८२ 
हिंगोली ६६४
नांदेड ९६५ 
लातूर ७८४
उस्मानाबाद १७३१
बीड २६०३ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com