...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !

शहरातून गावाकडे परतलेल्या सर्वांना प्रतिबंधात्मक म्हणून शासनाने 'होम क्वाॅरंटाइन' केले आहे. कुणीही दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडायचे नाही, अन्यथा पोलिसांचा दंडुका आपल्या स्वागताला आहे. या सगळ्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' आहे.
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !

सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. व्यवहार ठप्प आहेत. परदेशातून तसेच देशातील महत्त्वाच्या शहरातून गावाकडे परतलेल्या सर्वांना प्रतिबंधात्मक म्हणून शासनाने 'होम क्वाॅरंटाइन' केले आहे. कुणीही दैनंदिन व्यवहारासाठी बाहेर पडायचे नाही, अन्यथा पोलिसांचा दंडुका आपल्या स्वागताला आहे. या सगळ्या परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' आहे. तो शेतात जाऊन एकट्याने संपणारी सर्व कामे संपवतोय. त्याचा दिवस शेतात खपतोय. त्याच्या समोरच्या प्रश्नांची जंत्री खूप मोठी आहे.  लॉकडाऊनमुळे आवश्यकतेनुसार शेतमजूर मिळत नाहीत. मळणी मशीन, हळद शिजवण्यासाठी कुकर, इतर कामांसाठी यांत्रिक उपकरणे गरजेनुसार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तो आणखी चिंताग्रस्त आहे. दुधाची मागणी नेहमीप्रमाणे नसल्याने गावातील छोटे -छोटे डेअरी व्यावसायिक, गवळी यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेणे काही प्रमाणात कमी केले आहे. शाळू, हरभरा, गहू पिकांची मळणी अर्धवट स्थितीत आहे. अजूनही सुमारे २० ते २५ टक्के द्राक्ष क्षेत्र काढणीच्या टप्प्यात आहे. मात्र व्यापारी नाही आणि जरी असलाच तरी दर पाडून मागतो आहे. कोथिंबीर, मेथी, दोडका, वांगी, शेवगा, भोपळा, पालक अशी भाजीपाला वर्गीय पिके योग्य वेळेत बाजारात न गेल्याने खराब होत आहेत. कलिंगड, पेरू या फळ पिकांचा हंगाम जिल्हाभर जोरात आहे. मात्र मालाची अवस्था शेतात सडून जातील की काय अशी स्थिती आहे. 

दबक्या आवाजात शेतकरी कोरोनाची माहिती घेतोय. मात्र त्याबरोबरच तो हे कधी थांबेल? वाहन कधी सुरू होतील? अशी माहिती घेतोय मात्र लॉकडाऊन पंधरा मार्चपर्यंत असल्याने त्याच्या चिंतेत भर पडतेय. संचारबंदी मुळे शेतातल्या फेऱ्या थोड्या कमी झाल्यात इतकेच. समोरची अर्धवट स्थितीतील कामे पाहून, होणारे नुकसान पाहून त्याच्या पोटात कालवाकालव होत आहे.  तरीही संचारबंदी पाळतोय. मात्र, अडचणींचा डोंगर मोठा असल्याने त्याची अस्वस्थता ही खूप मोठी आहे. शेळ्यामेंढ्या पाळणारे पशुपालक जनावरांना घेऊन चारावयास नेत आहेत.  त्यांची अडचण वेगळीच आहे. या जनावरांचे बाजार ठप्प आहेत त्यामुळे महिन्यातून एखादे शेळीमेंढीचे कोकरू विकून आपला विकून आपला उदरनिर्वाह चालवणारे हे पशुपालक धास्तीत आहेत. 

प्रतिक्रिया...

  • कोरोना लवकर जावा यासाठी ते देवाकडे प्रार्थना करत आहेत. - शहाजी झुरे, ढालगाव, ता. कवठेमहांकाळ जि. सांगली  
  • कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने शेतकरी मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडले आहेत. ज्वारीची काढणी बाकी आहे. काहींचा कडबा रचून ठेवायचा बाकी आहे. उन्हाळी पाऊस समोर दिसू लागला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती आहे. डाळिंब छाटणीसाठी दहा ते बारा मजुरांची आवश्यकता असते मात्र संचारबंदी मुळे मजूर एकत्र येण्यास तयार नाहीत. शेतातील गहू,शाळू काढणी करून शेतात काढून टाकला. मजूर शेतात येईनात, गाळणी मशीन डिझेल अभावी बंद अवस्थेत आहे. मध्यंतरी पडलेल्या अवकाळीमुळे गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. गहू,शाळू कापणी करून सरीतच पडला आहे. पेट्रोल पंप बंदीमुळे गाळणी मशीन बंद आहेत. त्यामुळे गहू, शाळू खराब होऊन शेतात उगवतो की काय अशी स्थिती सध्या आहे.त्यामुळे आम्हांला शेतात क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. भाजीपाला विक्री अभावी शेतात सडत आहे. - अमोल भोसले, शेतकरी देवीखिंडी, ता. खानापूर, जि सांगली
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com