भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये बहुतांश विद्यमान पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये बहुतांश विद्यमान पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची निवड करण्यात आली असून, भांडारी यांच्याजागी केशव उपाध्ये यांना मुख्य प्रवक्तेपद देण्यात आले.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा समावेश विशेष निमंत्रितांच्या मंडळात करण्यात आला. पंकजा मुंडे यांना केंद्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे; तसेच विधानसभेतील मुख्य प्रतोद आमदार आशिष शेलार व आमदार माधुरी मिसाळ असतील, असेही ते म्हणाले.

जाहीर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये १२ प्रदेश उपाध्यक्ष, ६ प्रदेश सरचिटणीस व १२ चिटणिसांचा समावेश आहे. त्याशिवाय सात मोर्चा आणि १८ विविध प्रकोष्ठांची नियुक्तीही जाहीर करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष पदाची सूत्रे चंद्रकात पाटील यांनी फेब्रुवारीत स्वीकारल्यानंतर ही पदाधिकारी घोषणा करण्यात आली. कार्यकारिणीत तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

त्य़ाचबरोबर या पदाधिकारी कार्यकारिणीत ३३ टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. पक्ष पदाधिकाऱ्यांशिवाय कार्यकारिणीची घोषणाही करण्यात आली असून, पदाधिकाऱ्यांशिवाय ६८ जणांची कार्यकारिणी आहे. त्याशिवाय १३९ जण निमंत्रित असून ५८ जण विशेष निमंत्रित असतील. सर्व आमदार-खासदार हे कार्यकारिणीचे कायम निमंत्रित सदस्य असतील. त्याशिवाय कोषाध्यक्ष, कार्यालय प्रभारी, कार्यालय सहप्रभारी, प्रदेश कार्यालय मंत्री व सहकार्यालय मंत्री यांचीही घोषणा करण्यात आली. काही पदाधिकारी पुढीलप्रमाणे  सरचिटणीस ः सुजितसिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय उपाध्यक्ष ः राम शिंदे, चित्रा वाघ, कपिल पाटील, प्रसाद लाड, माधव भांडारी, सुरेश हळवणकर, प्रीतम मुंडे मुख्य प्रतोद ः आशिष शेलार, प्रतोद माधुरी मिसाळ, महिला मोर्चा ः उमा खापरे, युवा मोर्चा ः विक्रांत पाटील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com