सध्या लागवडीखालील भुईमुगाच्या गुंतागुंतीच्या जनुकीय इतिहासाचा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने शोध घेतला आहे. अमेरिकेमध्ये प्राचीन काळी लागवडीखाली असलेल्या दोन प्रजातींच्या वेगवेगळ्या संरचना मिळवल्या. पुढे या प्रजातींच्या संकरातून मिळवलेल्या सात पॅटर्नचे विश्लेषण केले आहे. या साऱ्या संशोधनातून भुईमुगाच्या जनुकीय इतिहासाचे सुस्पष्ट चित्र उभे राहण्यास मदत झाली आहे. यामुळे पिकाच्या कीड प्रतिबंधक आणि दुष्काळ सहनशील जातींच्या निर्मितीला चालना मिळू शकते. लागवडीखालील भुईमूग (शा. नाव- Arachis hypogaea) हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाखाली जागतिक पातळीवर सुमारे ५९ दशलक्ष हेक्टर क्षेत्र आहे. भुईमूग रोपांची वाढ आणि विकास यामध्ये कार्यरत विविध मूलद्रव्ये आणि पेशीय पातळीवरील यंत्रणांना जाणून घेण्यासाठी संशोधकांनी महत्त्वाचा प्रकल्प राबवला होता. वाढीच्या विविध टप्प्यामध्ये कार्यरत होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्माचा व त्यामागील जनुकांचा वेध घेतला आहे. त्यात अधिक बियाणे उत्पादन, तेलाचा दर्जामध्ये सुधार आणि मुळावरील सूत्रकृमीसारख्या नुकसानकारक व महागड्या ठरणाऱ्या रोग आणि किडींचा प्रतिबंध यांचा समावेश आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.