अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठातील विस्तार विभागाने उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन कोर्सेस सुरू केले आहेत. त्यात प्रामुख्याने हरितगृह आणि शोभेच्या वनस्पतीच्या लागवड व्यवस्थापनाचे प्रशिक्षण अंतर्भूत आहे. पूर्वमुद्रित (रेकॉर्डिंग) स्वरूपामध्ये असलेली माहिती ऐकता येते. शेतीमधील प्रशिक्षणे ही प्रामुख्याने प्रात्यक्षिकांवर आधारित असावीत, असा संकेत आहे. त्यामुळे कृषी शिक्षणातील ऑनलाइन कोर्सेस हा विषय तसा भारतामध्ये दुर्लक्षितच आहे. मात्र अमेरिकेतील मिशिगन राज्य विद्यापीठाने याबाबत आघाडी घेतली आहे. त्यांनी शेतीतील महत्त्वाच्या विषयांवर खास ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी खास शैक्षणिक मटेरिअल छायाचित्रांसह तयार केले आहे. या प्रशिक्षणामध्ये सामू (पीएच), क्षारता (ईसी) यांचे व्यवस्थापन, माध्यमांचे गुणधर्म आणि त्याचे पिकांवर होणारे परिणाम, प्रकाश व्यवस्था, जैविक नियंत्रण यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणासाठी परीक्षा असली, तरी गुणांचे बंधन ठेवण्यात आले नाही. शेतकरी आपल्या सवडीनुसार तीन महिन्यांपर्यंत यातील कोणतेही प्रशिक्षण पूर्ण करू शकतात. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी प्रत्येकी १२९ डॉलर इतके शुल्क ठेवण्यात आले आहे. त्याची अंतिम तारीख १५ जून असून, एक जून ते ३१ ऑगस्ट या काळामध्ये हे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रकाश व्यवस्थेसंबंधीच्या स्पॅनिश कोर्स १ जुलैपासून ३० सप्टेंबरपर्यंत असणार आहे. ...असे आहेत कोर्सचे विषय
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.