अल्फाअल्फा हे पीक अमेरिकेतील बहुतांश ठिकाणी पडणाऱ्या कडाक्याच्या हिवाळ्यात तग धरू शकत नाही. त्याऐवजी मशागत शून्य स्थितीमध्ये अन्य चारा पिकांची लागवड करून, उत्पादन, पोषणमूल्य या निकषावर अभ्यास करण्यात येत आहे. अमेरिकतील पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये अल्फाअल्फाची प्रामुख्याने लागवड केली जाते. अन्य राज्यांमध्ये पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे अल्फाअल्फा पिकाचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांना चाऱ्याची कमतरता भासते. हिवाळ्यातील नुकसानाचे प्रमाण कमी करण्यासाठी मिन्निसोटा विद्यापीठातील संशोधक प्रयत्न करत आहेत. कडाक्याच्या हिवाळ्यामुळे अल्फाअल्फा पीक काढावे लागलेल्या किंवा मृत झालेल्या शेतीमध्येच नव्याने मशागतीशिवाय विविध चारा पिकांची लागवड करून त्याच्या चाचण्या सुरू आहेत. त्याविषयी माहिती देताना एम. स्कॉट वेल्स यांनी सांगितले, की वार्षिक चारा पिकांच्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरण्याच्या दृष्टीने चाचण्या घेतल्या जात आहेत.
महत्त्वाचे चारा पीक ः अल्फाअल्फा हे बहुवर्षीय चारापीक अकून, दुधाळ जनावरांबरोबरच घोडे, शेळ्या आणि मेंढ्यांच्या पशुखाद्यामध्ये वापरले जाते. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण १६ ते २० टक्के इतके उच्च असते. त्याचप्रमाणे त्यात कॅल्शिअम, अन्य खनिजे आणि जीवनसत्त्वेही योग्य प्रमाणात असतात. या चारापिकाचा अमेरिकेच्या वार्षिक आर्थिक उलाढालीमध्ये अब्जावधी डॉलरइतका मोठा वाटा आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.