सोयाबीनवर मिलीपीडचा प्रादुर्भाव
सोयाबीनवर मिलीपीडचा प्रादुर्भाव

साकुर परिसरात सोयाबीन पिकावर मिलीपीड

मिलीपीड ही किड स्थानिक भाषेत वाणी, पैसा या नावाने ओळखली जाते. पावसाने उघडीप दिल्याच्या काळात जमिनीतील भेगातून ही कीड बाहेर पडते आणि उगवलेले पीक खाते. सीआयबीकडून या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्याच कीटकनाशकाची शिफारस नाही. त्यामुळे मिलीपीडचे समूह केरोसीनच्या पाण्यात बुडवून नष्ट करावे हा एकच उपाय आहे. - डॉ. अनिल कोल्हे , मुख्य पीक संरक्षण अधिकारी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

आर्णी, जि. यवतमाळ  ः यावर्षी पहिल्या टप्प्यात पाऊस झाल्याने हुरूप वाढलेल्या शेतकऱ्यांनी लगबगीने पेरण्या आटोपल्या. पीक अंकुरले आणि आता ते चांगले बहरात असतानाच मिलीपीड (वाणू) या किडीचा प्रादुर्भाव त्यावर झाल्याचे दिसून आले आहे.

यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीन लागवडीला प्राधान्य दिले आहे. आर्णी तालुक्‍यातील साकुर परिसरातील शेतकऱ्यांनी देखील सोयाबीन लागवड केली. दहा जूनपासून चार दिवस सलग झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुरेशी ओल असल्याची खात्री करून सोयाबीन पेरले. त्यानंतर बी अंकुरले आणि आता पीकवाढीच्या टप्‍प्यात असताना मिलीपीडचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

ही कीड रोप खाऊन टाकते. गेल्या तीन ते चार दिवसांत साकुर शिवारात याच कारणामुळे १०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. २००५ मध्ये सुद्धा साकुर शिवारात मिलीपीडचा प्रादुर्भाव दिसून आला होता.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com