संयुक्त किसान मोर्चात पडली फूट 

संयुक्त किसान मोर्चात(Sanyukta Kisan Morcha) सहभागी एकूण ३२ शेतकरी संघटनेच्या नेत्यांपैकी केवळ १८ संघटनेच्या नेत्यांनीच आजच्या बैठकीत हजेरी लावली. अन्य ११ संघटनांच्या नेत्यांनी संयुक्त किसान मोर्चाकडे (Sanyukta Kisan Morcha) पाठ फिरवल्याचे उघड झाले आहे. तर ३ संघटनेच्या नेत्यांनी केवळ शाब्दिक समर्थन दिले आहे.
11 Organisation Elevated from SKM
11 Organisation Elevated from SKM

पाच राज्यांच्या निकालानंतर दिल्लीत सोमवारी पुन्हा एकदा संयुक्त किसान मोर्चाची (Sanyukta Kisan Morcha) बैठक झाली. या बैठकीत नव्याने किसान आंदोलन (Kisan Andolan) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या २१ मार्च रोजी देशभरात निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. योगेंद्र यादव, दर्शन पाल राकेश टिकैत आदी नेते या बैठकीस हजर होते.  

संयुक्त किसान मोर्चाच्या (Sanyukta Kisan Morcha) बॅनरखाली झालेल्या किसान आंदोलनात ऐक्यभावना जोपासणाऱ्या शेतकरी संघटनांत निवडणुकीत सहभागी होण्यावरून मतभेद झाले होते. या मतभेदाचे रूपांतर आता उघड विभागणीत झाले आहेत. सोमवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत हे दिसून आलं आहे.

संयुक्त किसान मोर्चात (Sanyukta Kisan Morcha) सहभागी एकूण ३२ शेतकरी संघटनेच्या नेत्यांपैकी केवळ १८ संघटनेच्या नेत्यांनीच आजच्या बैठकीत हजेरी लावली. अन्य ११ संघटनांच्या नेत्यांनी संयुक्त किसान मोर्चाकडे (Sanyukta Kisan Morcha) पाठ फिरवल्याचे उघड झाले आहे. तर ३ संघटनेच्या नेत्यांनी केवळ शाब्दिक समर्थन दिले आहे.

व्हिडीओ पहा- 

किसान आंदोलनात (Kisan Andolan)ऐक्यभावना जोपासणाऱ्या संयुक्त किसान मोर्चात सहभागी शेतकरी संघटना निवडणुकीच्या राजकारणातील सहभागावरून विभागल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्वराज अभियान (Swaraj Abhiyan)आणि जन किसान संघटनेचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी संयुक्त किसान मोर्चातील (Sanyukta Kisan Morcha) फुटीसाठी पंजाबमधील निवडणुकीत सहभागी संघटना जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर भारतीय किसान युनियनचे (BKU)राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आपण यानंतरही संयुक्त किसान मोर्चासोबत असल्याची  ग्वाही दिली आहे. 

काय आहेत बैठकीतील प्रमुख निर्णय ?

येत्या २१ मार्च रोजी देशभरात केंद्र सरकारने केलेल्या विश्वासघाताविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. येत्या २५ मार्च रोजी चंदीगड येथून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.  त्यांनतर एक आठवडाभर हमीभावासाठी (MSP) निदर्शने करण्यात येणार असल्याचंही दर्शन पाल यांनी सांगितलं आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com