Vegetable Rate : सोलापुरात कारली, दोडका, गवारला उठाव, दरातही सुधारणा

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कारली, दोडका, गवारला चांगला उठाव मिळाला
Vegetables Rate
Vegetables Rate Agrowon
Published on
Updated on

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Market Committee) आवारात गतसप्ताहात कारली, दोडका, गवारला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवक तशी जेमतेम राहिली, पण मागणीतील सातत्यामुळे दरात पुन्हा सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.

Vegetables Rate
Crop Damage Compensation : सिंदखेडराजात चार मंडलातील शेतकरी मदतीपासून वंचित

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कारल्याची आवक रोज १५ क्विंटल, दोडक्याची २० क्विंटल आणि गवारची १० ते १२ क्विंटल अशी राहिली. या सर्व फळभाज्यांची आवक स्थानिक भागातूनच राहिली. पण मागणी असल्याने या आधीच्या सप्ताहाच्या तुलनेत दरात मात्र चांगली सुधारणा झाली.

कारल्याला प्रतिक्विटंलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, दोडक्याला किमान १५०० रुपये, सरासरी २५०० रुपये आणि सर्वाधिक ४५०० रुपये तर गवारला ३५०० रुपये, सरासरी ४५०० रुपये आणि सर्वाधिक ५५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय टोमॅटो, सिमला मिरचीचे दरही काहीसे स्थिर राहिले.

Vegetables Rate
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

टोमॅटोची आवक प्रतिदिन १०० ते २०० क्विंटलपर्यंत तर सिमला मिरचीची आवक दोन ते पाच क्विटंलपर्यंत राहिली. टोमॅटोला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये तर सिमला मिरचीला किमान २५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये असा दर मिळाला.

कांदा दर टिकून

या सप्ताहात कांद्याची आवक बऱ्यापैकी राहिली. रोज १०० ते १५० गाड्यांपर्यंत आवक राहिली. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच राहिली. पण मागणीमुळे या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याचे दर पुन्हा टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com