Solapur News : सोलापूरसह राज्यात सोयाबीन, मूग व उडीद या खरीप पिकांची हमीभावाने खरेदीबाबत कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही. त्याबाबत अद्याप सरकारचा आदेश न आल्याने आणि खरेदी केंद्रांची निवड न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. कारण आधीच अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांना शेतमालाची विक्री करावी लागत आहे..सोलापूरसह राज्यातील शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदीची आतुरतेने वाट पाहत आहेत. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रक्रियेला सुरवात झाली होती. दिवाळीच्या आधी खरेदी केंद्र सुरू व्हायला हवे होते. मात्र, दिवाळी संपूनही त्याबाबत सरकार व प्रशासकीय पातळीवर कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. जिल्हास्तरावर कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. .Soybean MSP Procurement: राज्यात १० लाख टन सोयाबीन खरेदी होणार? राज्याने केंद्राकडे पाठवला प्रस्ताव.त्यामुळे खरेदी केंद्र सुरू होणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांत संभ्रम व अनिश्चितता दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीने संकटात सापडलेला शेतकऱ्याला बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन, मूग व उडीद विकावे लागत आहे.मंत्री रावल यांच्याकडून नाही प्रतिसाद हमीभाव खरेदी केंद्रांबाबत राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही..Soybean Procurement: दिवाळी उलटून गेल्यानंतरही सोयाबीन खरेदीचा घोळच.प्रक्रियेतील बदलामुळे विलंबराज्यातील तेलबिया आणि कडधान्य खरेदी प्रक्रियेत बदल केला आहे. ‘नाफेड’च्या माध्यमातून होणाऱ्या सरकारी खरेदीसाठी नव्या नियमावलीची अंमलबजावणी केली आहे. यंदा प्रथमच पुण्याच्या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाला राज्यातील नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे..अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व शेजारच्या मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या भावांतर योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी दिवाळीपूर्वी सरकारी खरेदी सुरू व्हायला हवी होती. मात्र, यंत्रणा बदलासह नव्या नियमांतील गोंधळामुळे प्रक्रियेला विलंब होण्याची चिन्हे आहेत.सोलापूरच्या बाजार समितीतील प्रतिक्विंटल सरासरी दरसोयाबीन ३,८००सोयाबीन स्थानिक ४०००मूग ५,४२५उडीद ५,३०० .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.