Milk Rate : गायीच्या दूध खरेदीदरात दोन रुपयांपर्यंत वाढ

राज्यातील खासगी डेअरी व सहकारी दूध संघांनी गाय दुधाच्या विक्रीदरात वाढ केली आहे. मात्र या वेळी खरेदीदरांत देखील प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
Milk Rate
Milk RateAgrowon

पुणे ः राज्यातील खासगी डेअरी व सहकारी दूध संघांनी गाय दुधाच्या विक्रीदरात (Cow Milk Rate) वाढ केली आहे. मात्र या वेळी खरेदीदरांत (Cow Milk Purchase Rate) देखील प्रतिलिटर एक ते दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डेअरी उद्योगाने (Dairy Industry) शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

राज्यात सध्या दूध मुबलक असून लांबलेल्या मॉन्सूनमुळे पाण्याचे साठे, चारा स्थिती अजूनही चांगली आहे. त्यामुळे दूध संकलनात ५ ते ७ टक्के वाढ झालेली आहे. संकलन चांगले असल्यास दुधाचे खरेदीदर वाढत नाहीत.

मात्र सध्या दूध भुकटी व लोण्याचे दर तेजीत आहेत. त्यामुळे दुधाला मागणी आहे. दुसऱ्या बाजूला ‘अमूल’कडून दुधाच्या खरेदीदरात एक रुपयाने वाढ करीत प्रतिलिटर ३७ रुपयांपर्यंत दर देणे सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील इतर डेअरी चालकांनीही ३७ ते ३८ रुपयांच्या दरम्यान खरेदीदर नेले आहेत.

Milk Rate
Milk Powder Rate : दूध भुकटीची दर वाढ कायम

प्रमुख डेअरी उद्योग समूहांनी अलीकडेच एक बैठक घेतली. त्यात २२ डेअरींच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांचे पदाधिकारी व प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. डेअरीचालकांनी या वेळी दूध खरेदीचे दर, प्रक्रिया, वाहतूक या घटकांचा आढावा घेतला.

सर्व घटकांवरील खर्चात वाढ झाल्यामुळे पिशवीबंद दुधाचे दर वाढवावे लागतील, असे काही डेअरीचालकांनी या बैठकीत सांगितले. राज्यात पिशवीबंद दुधाच्या विक्री क्षेत्रात परराज्यांतील डेअरींचे प्राबल्य वाढते आहे.

त्यामुळे किरकोळ दुधाच्या दरप्रणालीबाबत बदल करणे क्रमप्राप्त होत आहे. राज्यातील डेअरी व्यावसायिकांना बाजारातील त्यांची पिशवीबंद दुधाची विक्री टिकवून ठेवायची असल्यास दरवाढीशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे विक्रीदरातील वाढ एक फेब्रुवारीपासून लागू करण्यात आली.

Milk Rate
Katraj Milk Rate : कात्रज डेअरीच्या दुधाच्या दरात आजपासून वाढ

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी (कात्रज) दूध संघाने गाय दुधाच्या विक्रीदराबरोबरच खरेदीदरात वाढ केली. कात्रज संघाच्या संचालकांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कात्रज संघाच्या अध्यक्षा सौ. केशरताई पवार यांच्या म्हणण्यानुसार, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता संघाकडून आता ३.५ फॅट्स व ८.५ एसएनएफ दुधाच्या खरेदीसाठी दूध संस्थांना वरकड खर्चासह प्रतिलिटर ३७.८० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढीव दर बुधवारपासून (ता.१) लागू करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी संघाच्या दूध विक्रीदरातही वाढ केली आहे. त्यामुळे टोन्ड, डबल टोन्ड, प्रमाणित व मलई या चारही श्रेणीतील दुधाच्या विक्रीदरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ केली गेली आहे.

स्पर्धेमुळे स्थानिक पिशवीबंद दूध प्रकल्प संकटात

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले, की दूध खरेदीदरातील उतार चढाव आता पिशवीबंद दूध विक्री उद्योगाच्या हाती राहिलेला नाही.

खरेदीदरातील बदल आता भुकटी व लोणी उद्योगाच्या उलाढालींवर अवलंबून आहेत. राज्यात पिशवी बंद दुधाच्या विक्री करणाऱ्या उद्योगांची संख्या २६० आहे.

राज्यात संकलित होणाऱ्या अंदाजे पावणेदोन कोटी लिटर दुधापैकी ७० लाख लिटर दूध या उद्योगांकडून पिशवी बंद करून विकले जाते. बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेमुळे स्थानिक पातळीवरील अनेक पिशवी बंद दूध प्रकल्प संकटात आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com