Agricultural Market Report : हळदीचे उत्पादन घटल्याने किमती टिकून

Market Trends-Cotton, Turmeric, Soybean & More : आता हळदीची आवक वाढू लागली आहे. वाढती आवक मुख्यतः सांगली व निजामाबाद या बाजारात झाली आहे. या वर्षी हळदीचे उत्पादन मागणीपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे.
Turmeric Market
Turmeric Agrowon
Published on
Updated on

फ्यूचर्स किमती : सप्ताह २२ ते २८ मार्च २०२५

आता हळदीची आवक वाढू लागली आहे. वाढती आवक मुख्यतः सांगली व निजामाबाद या बाजारात झाली आहे. या वर्षी हळदीचे उत्पादन मागणीपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे किमती टिकून आहेत. कांद्याची व टोमॅटोची आवक वाढती आहे. रब्बी कांद्याची आवक एप्रिल महिन्यात सुरू होईल.

२५ मार्च रोजी सेबीने हरभरा, मूग, सोयाबीन, तूर, गहू, सोयातेल, सोयापेंड, पाम तेल या शेतीमालाच्या फ्यूचर्स व्यवहारांवर घातलेली बंदी मार्च २०२६ पर्यंत कायम राहील, असे जाहीर केले आहे. हे अतिशय निराशाजनक आहे.

आपल्याकडील फ्यूचर्स एक्स्चेंजसंबंधीचे धोरण कधीच स्थिर नव्हते. त्यातील धरसोड पद्धत यातील व्यवहारांना बाधा आणतेच, त्याशिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भावांना सर्वस्वी स्थानिक कारणांचा आधार मिळतो. पुढारलेल्या देशात बहुतेक सर्व शेतीमाल कापणीपूर्व करार करून विकला जातो; त्यांना एक्स्चेंजमधील किमती आधारभूत ठरतात. हेजिंग, ऑप्शन सारखे व्यवहार केल्यामुळे शेतकरी, प्रक्रिया उद्योग व व्यापारी या सर्वांना सुरक्षा लाभते.

आपल्या शासनाच्या अस्थिर धोरणामुळे NCDEX आणि MCX मधील शेत-वस्तूंचे व्यवहार नीट रुजलेच नाहीत. NCDEX मध्ये, जेथे केवळ शेत-वस्तूंचेच व्यवहार होतात, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या ११ महिन्यात झालेल्या व्यवहारांचे मूल्य केवळ रु. १२६ हजार कोटी होते. MCX मध्ये मूल्य रु. २.५ हजार कोटी होते; मात्र MCX मध्ये बिगर-शेत वस्तूंचे व्यवहार मूल्य या कालावधीत रु. ६,४०५ हजार कोटी होते.

NCDEX मधील शेत-वस्तूंमध्ये ५० टक्के व्यवहार गवार बी व गवार गम यांचेच होते. हळदीचा सहभाग १३ टक्के होता. कापूस व कपास यांचा सहभाग नगण्य तर मक्याचा जवळ जवळ शून्य होता. (फ्यूचर्स एक्स्चेंजमध्ये चीनने घेतलेली आघाडी लक्षणीय व अभ्यासनीय आहे).

२८ मार्च २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.

कापूस/कपाशी :

MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात १ टक्क्याने घसरून रु. ५३,५५० वर आले आहेत. मे फ्यूचर्स भाव रु. ५४,२५० वर आले आहेत. जुलै भाव रु. ५६,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत.

NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) या सप्ताहात ०.७ टक्क्याने वाढून रु. १,४४२ वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,४५६ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४९३ वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ३.५ टक्क्यांनी अधिक आहेत.

कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,१२१ व लांब धाग्यासाठी रु. ७,५२१ आहेत.\

मका :

NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (छिंदवाडा) या सप्ताहात ०.२ टक्क्याने घसरून रु. २,२५० वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ०.४ टक्क्याने घसरून रु. २,२५९ वर आल्या आहेत. जून फ्यूचर्स रु. २,२८८ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.७ टक्क्याने अधिक आहे. सध्याचे स्पॉट व फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा (रु. २,२२५) अधिक आहेत.

हळद :

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) या सप्ताहात १.६ टक्क्याने वाढून रु. १३,५४९ वर आल्या आहेत. एप्रिल फ्यूचर्स किमती ०.९ टक्क्याने घसरून रु. १३,२७८ वर आल्या आहेत. मे किमती रु. १३,३८२ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.२ टक्क्याने कमी आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भाव रु. १५,१५० आहे.

Turmeric Market
Chana Import Duty: हरभरा आयातीवर १०% शुल्क; सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय!

हरभरा :

हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने वाढून रु. ५,७२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ५,६०० वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,६५० आहे. आवक वाढती आहे.

मूग :

मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) रु. ७,८०० वर स्थिर आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,६८२ आहे. मुगाचा हंगाम आता संपला आहे.

Turmeric Market
Summer Soybean Sowing : उन्हाळ सोयाबीन खानदेशात कमी

सोयाबीन :

गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) १.२ टक्क्याने वाढून रु. ४,१९२ वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा ३.६ टक्क्यांनी वाढून रु. ४,३४३ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,८९२ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजार भाव कमी आहे. भाव या वर्षी वाढण्याचा संभव कमी आहे.

तूर:

गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) १.१ टक्क्याने वाढून रु. ७,६५९ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर स्थिर आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,५५० आहे. आवक कमी होऊ लागली आहे.

कांदा:

कांद्याची किंमत (पिंपळगाव बसवंत) या सप्ताहात रु. १,४८२ वर आली आहे. कांद्याची आवक टिकून आहे; रब्बीची आवक एप्रिलपासून सुरू होईल. कांद्याच्या किमतीवर लक्ष ठेवणे जरूर आहे.

टोमॅटो:

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किंमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ७५० वर आली होती; या सप्ताहात ती रु. ७०८ वर आली आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com