Turmeric Rate: हिंगोलीत हळद दरात सुधारणा

Hingoli APMC: हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत हळद दरात सौम्य वाढ दिसून आली आहे. सध्या सरासरी १२,००० रुपये दर असून काही शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने हळद रोखून ठेवली आहे.
Turmeric
TurmericAgrowon
Published on
Updated on

Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीचे दर दबावात आहेत. किंचित चढ-उतार सुरू आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत किमान दरात २०० ते १००० रुपयांनी तर आणि कमाल दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली. सोमवारी (ता. २३) हळदीची २१०० क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १३००० रुपये तर सरासरी १२००० रुपये दर मिळाले.

मागील एक ते दीड महिन्यापासून हळदीला कमाल १३ हजार रुपयापर्यंत दर मिळत आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप हळद विक्रीस काढली नाही. दर कमी अधिक होत आहेत. मागील आठवड्यात हळदीच्या आवेकत वाढ झाली. सोमवार (ता. १६) ते सोमवार (ता. २३) या कालावधीत हळदीची प्रतिदिन १४२८ ते २१०० क्विंटल आवक होती. आठवड्याभरात एकूण १० हजार ८८५ क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल १०५०० ते १३००० रुपये दर मिळाले.

Turmeric
Turmeric Rate: हिंगोलीत हळद दरात नरमाईच

हळद दर रुपयांत, आवक क्विंटलमध्ये

तारीख---आवक---किमान---कमाल---सरासरी

ता. १६---१८२५---१०५००---१२९००---११७००

ता. १७---२०५०---१००००---१२८००---११४००

ता. १८---१६८०---१०८००---१२८००---११८००

ता. १९---१४८०---१०७००---१२८००---११७५०

ता. २०---१७५०---१०८००---१२८०० ११८००

Turmeric
Turmeric Cultivation: राज्यात ३० टक्के क्षेत्रावर हळद लागवडी पूर्ण

हरभरा दरात नरमाईच

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात हरभरा तसेच सोयाबीनच्या दरात किंचित चढ-उतार सुरू आहेत. सोमवारी (ता. २१) हरभऱ्याची ३०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५५०० रुपये तर सरासरी ५२५० रुपये दर मिळाले.सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३९०० ते कमाल ४४०० रुपये तर सरासरी ४१५० रुपये दर मिळाले.

ज्वारीची २० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १७०० ते कमाल २२०५ रुपये तर सरासरी १९५२ रुपये दर मिळाले. गव्हाची ४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान २६०० ते कमाल ३१०५ रुपये तर सरासरी २८५० रुपये दर मिळाले.ज्वारीच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी घसरण झाली. तर गव्हाच्या दरात ५०० ते ७०० रुपयांनी सुधारणा झाल्याचे धान्य बाजारातील सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com