Tur Price Increase: विदर्भातील बाजारात तुरीचा दर ६८०० ते ७४२१ रुपयांवर

Market Update: अमरावती बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी रोजची तूर आवक सहा हजार क्‍विंटलपेक्षा अधिक होत असून दर ६८०० ते ७४२१ रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: शासनाकडून तुरीला ७५५० रुपयांचा हमीभाव जाहीर केलेला आहे. मात्र बाजारात हंगामातील नव्या तुरीची आवक वाढती असताना दर दबावात असल्याचे चित्र आहे. अमरावती बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी रोजची तूर आवक सहा हजार क्‍विंटलपेक्षा अधिक होत असून दर ६८०० ते ७४२१ रुपयांवर स्थिरावल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

प्रक्रिया उद्योगाची कमी मागणी आणि अधिकचा ओलावा अशा दोन कारणांआड तुरीचे दर दबावात ठेवले जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या बाजारात दिवसाआड तुरीची आवक वाढती असल्याचे चित्र आहे. बाजारातील दरात आणखी घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळेच सोमवारी (ता. ३) बाजारात तूर आवक ८५०० क्‍विंटलपेक्षा अधिक नोंदविण्यात आली.

Tur
Tur Production : बेडवरील तुरीने दिले भरघोस उत्पादन

परंतु या वेळी बाजारात तुरीचे दर ६८०० ते ७३३० असे होते. जास्तीचा मिळणारा दर हा जुन्या तुरीला मिळत असल्याचे सांगितले जाते. नव्या तुरीला मात्र सरासरी ६८०० ते ७००० असाच दर बाजारात आहे. या व्यवहारात प्रति क्‍विंटल ५५० ते ७०० रुपयांपर्यंतचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. कारंजा लाड (वाशीम) बाजार समितीत देखील तुरीची आवक ३४०० क्‍विंटल इतकी होत आहे. या बाजारात तुरीचे दर अमरावतीच्या तुलनेत अधिकच दबावात होते. या ठिकाणी ६३०० ते ६८५५ रुपये क्‍विंटल असा दर तुरीला मिळत आहे.

यवतमाळ बाजार समितीत देखील पाच हजार क्‍विंटलपेक्षा अधिक तूर आवक नोंदविली जात आहे. या ठिकाणी तुरीचे दर ६४०० ते ७१८० रुपयांवर स्थिरावले आहेत. या ठिकाणी प्रति क्‍विंटल ९०० ते १००० रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. चांदूरबाजार (अमरावती) बाजार समितीत तुरीला ६५०० ते ७६५० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत असल्याचे बाजार सूत्रांकडून सांगण्यात आले.

Tur
Tur Rate: तुरीचे दर बाजारात हमीभावापेक्षाही कमी; शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली

अकोला बाजार समितीत तुरीची आवक अवघी २०८९ क्‍विंटल इतकी झाली. हंगामात सर्वाधिक तूर आवक या बाजार समितीत होते. परंतु दर दबावात असल्याने शेतकऱ्यांकडून तुरीच्या साठवणुकीवर भर दिला जात आहे. त्यामुळे आवक कमी असून सध्या या ठिकाणी ५५०० ते ७६०० रुपये असा दर तुरीला मिळत आहे.

शेगावला सर्वांत कमी दर

पश्‍चिम विदर्भातील शेगाव (बुलडाणा) बाजार समितीमध्ये तुरीची आवक आणि दर सर्वाधीक दबावात असल्याचे चित्र होते. या ठिकाणी तुरीची सरासरी २७० क्‍विंटल आवक होत आहे. तुरीला ७५५० रुपयांचा हमीभाव असताना येथे केवळ ५८०० ते ६९५० रुपये या दराने तुरीचे व्यवहार होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

तुरीसाठी हमीभाव केंद्र

अमरावती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच ‘नाफेड’च्या माध्यमातून तुरीची खरेदी व्हावी, अशी मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. बाजारात तुरीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जावे, यासाठी लवकरात लवकर नोंदणी व खरेदी व्हावी, अशी मागणी आहे. त्यासोबतच वरुड बाजार समिती तसेच खरेदी विक्री संघाकडून देखील याचप्रकारची मागणी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com