Market Bulletin: सोयाबीनमध्ये चढ उतारदेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र सरासरी भावपातळी टिकून आहे. सोयाबीनचे प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव प्रतिक्विंटल ५ हजार ८०० ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. तर बाजार समित्यांमधील खरेदीचे भाव ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील सोयाबीनची आवक सध्या कमीच आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर टिकून राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापूस स्थिरावलादेशातील बाजारात कापसाच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार सुरु होते. पण आज भाव काहीसा स्थिरावला आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. मात्र सीसीआयची कापसाची विक्री आणि सरकारने अतिरिक्त लांब धाग्याच्या कापूस आयातीवरील शुल्क काढल्याने बाजारावर परिणाम दिसत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेने कापडावर आयात शुल्क कमी केल्याचा बाजाराला आधार मिळत आहे. आज कापसाला बाजारात सरासरी ७ हजार ८०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कापसाचा भाव या दरम्यान स्थिरावू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..US SeaFood Export : अमेरिकेत कोळंबीसह सागरी उत्पादन निर्यात वाढणार; आयात शुल्क कमी केल्याचा फायदा होणार .तुरीचे भाव टिकूनदेशातील बाजारात सध्या तुरीचा भाव टिकून आहे. सध्या तुरीचा सरासरी भाव हमीभावापेक्षा अधिक आहे. यंदा सरकारने तुरीला ८ हजारांचा हमीभाव जाहीर केला आहे. पण यंदा देशातील घटलेले उत्पादन, निर्यातदार देशांमधील कमी उपलब्धता आणि मागणी यामुळे तुरीच्या भावात तेजी आली आणि भाव हमीभावाच्या पुढे सरकले आहेत. सध्या बाजारात तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. तुरीचा भाव या पातळीच्या दरम्यान आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Sugarcane Crisis 2026: ऊस उत्पादक, साखर उद्योगाला यंदाही ठेेंगाच .डाळिंबाचे भाव टिकूनराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून डाळिंबाचे भाव स्थिरावलेले आहेत. मध्यंतरी डाळिंबाच्या भावात काहीशी नरमाई आली होती. तर दुसरीकडे डाळिंबाचा उठाव कायम आहे. यामुळे दरपातळी टिकून आहे. सध्या डाळिंब प्रतिक्विंटल ८ हजार ते १० हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. डाळिंबाची आवक पुढील काही काळ कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळिंबाचा भावही टिकून राहू शकतो, असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला..आल्याला उठावराज्यातील बाजारात आल्याची आवक सरासरीएवढी होत आहे. तर आल्याला उठावही चांगला आहे. याचा परिणाम आल्याच्या भावावर दिसून येत आहे. आले उत्पादनाला यंदा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. याचा आधार भावाला मिळत आहे. सध्या आले प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ५ हजारांच्या दरम्यान विकले जात आहे. आल्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे. आल्याला उठाव मात्र पुढील काळात वाढण्याचा अंदाज आहे. यामुळे आल्याच्या भावालाही चांगला आधार राहील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.