
Nagpur News : कळमना बाजार समितीत गेल्या आठवड्यात तुरीची आवक १००० क्विंटलवर पोहचली असताना या आठवड्यात त्यात घट नोंदविण्यात आली आहे. सध्या नियमित ५८२ क्विंटल इतकी आवक होऊन दर ६२०० ते ६८५१ रुपयांवर होते. तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यानेच आवक कमी झाल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
दरवाढीच्या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केली होती. मात्र त्यानंतरही दरवाढ न झाल्याने ही तूर विक्रीसाठी बाजारात आणण्यात आली. त्यामुळेच आवक वाढून १००० क्विंटलच्या पुढे गेली होती. आता मात्र ती निम्म्याने कमी होत ५८२ क्विंटलवर आली आहे. सद्या तुरीला ६३०० ते ६८९१ रुपयांचा दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.
बाजारात अपवादात्मकस्थितीत उडदाची देखील आवक होत आहे. गेल्या आठवड्यात ११ तर या आठवड्यात ती तीन क्विंटल इतकी झाली. उडिदाला या आठवड्यात ५००० ते ५२०० रुपयांचा दर मिळाला. गेल्या आठवड्यात याचे दर ६२०० ते ६४०० रुपयांवर होते. सरबती गव्हाचे व्यवहार ३२०० ते ३५०० रुपयांनी होत असून याची आवक २०० क्विंटल झाली.
स्थानिक गव्हाला २५०० ते २६२६ रुपयांचा दर मिळत आवक १९५ क्विंटल नोंदविली गेली. सोयाबीन आवकेमध्ये देखील चढउतार नोंदविण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात १५० ते २६० क्विंटल अशी आवक सोयाबीनची होती.
या आठवड्यात सहा क्विंटल इतकी अत्यल्प आवक झाली. ३७०० ते ४१५० रुपयांचा दर सोयाबीनला मिळाला. काहीसा सुगंधित असलेल्या चिनोर जातीच्या तांदळाला ६२०० ते ६५०० रुपयांचा दर मिळत आवक २० क्विंटल झाली.
परमल तांदळाची आवक ३० क्विंटलची होत ३५०० ते ३८०० रुपयांचा दर मिळाला. लाल मिरचीची आवक ८५२ क्विंटलवर पोहचली असून ११००० ते १४००० रुपयांवर दर स्थिर होते. मुगाची आवक ३०३ क्विंटल इतकी असून ५८०० ते ६००० रुपयांचा दर याला मिळत आहे.
तोतापुरी आंब्याला २००० ते ३००० रुपयांचा दर मिळत आवक २३३ क्विंटलची झाली. स्थानिक आंबा वाणाला १५०० ते २००० रुपयांचा दर मिळत आवक ११५२ क्विंटलची झाली.
भाजी बाजारात चढउतार (कमीतकमी जास्तीतजास्त दर रुपयात)
वाल भाजी ः ५०००-६०००
वांगी ः १५००-२५००
टोमॅटो ः १५००-२०००
कलिंगड ः १५००-२०००
सीताफळ ः ४०००-७०००
पालक ः ३०००-४०००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.