Fruit Market: स्थानिक फळ व भाजीपाला बाजारात गेल्या महिनाभरापासून आंब्याची आवक स्थिर असून, दररोज सरासरी एक हजार क्विंटल आंब्याची आवक होत आहे. देशातील विविध भागांतून येणाऱ्या आंब्याच्या विविध वाणांना बाजारात मागणी कायम असून, गुणवत्तेनुसार दरातही चढ-उतार दिसून येत आहेत. यामध्ये तोतापुरी आंब्याला सर्वाधिक १० हजार ते १५ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे..तोतापुरी आंब्याची आवक सध्या ७० क्विंटल असून, मर्यादित पुरवठा आणि चांगली मागणी यामुळे दर चांगले राहिले आहेत. त्यापाठोपाठ केसर आंब्यालाही ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. .Mango Seizure: वाशी बाजार समितीत कृत्रिमरीत्या पिकविलेले ११ लाखांचे आंबे जप्त.केसरची आवक १२४ क्विंटल असून, त्याचे व्यवहार ८ हजार ते १० हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान होत आहेत. लंगडा आंब्याची आवक ११० क्विंटल नोंदविण्यात आली असून या वाणाला ६ हजार ते ७ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. .Mango Season: ग्रामीण भागात वाढली गावरान आंब्याला मागणी.तर नीलम आंब्याची आवक केवळ ५० क्विंटल असून, त्याचे व्यवहार ४ हजार ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान होत आहेत. दशहरी आंब्याची आवक १२७ क्विंटल झाली असून, त्यालाही ४ हजार ते ५ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. बाजारात सर्वाधिक आवक बैंगनपल्ली आंब्याची नोंदविण्यात आली. .या वाणाची २४७ क्विंटल आवक झाली असून, त्याचे व्यवहार ३ हजार ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान झाले. तसेच लाल पट्टा आंब्याची आवक १५३ क्विंटल असून, त्याला ४ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.