Market Bulletin: कापूस स्थिरावलाकापसाचा भाव आज बाजारात स्थिरावला होता. कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. बाजारातील कापसाची आवक आजही कमीच होती. कापसाला सध्या पाॅलिस्टर वाढल्याने चांगला भाव मिळत आहे. सीसीआयही भाव वाढवून कापसाची विक्री करत आहे. रोज २ ते अडीच लाख गाठींच्या दरम्यान कापसाची विक्री लिलावाद्वारे केली जात आहे. देशात कापसाला उठाव कायम राहून कापसाचे भाव टिकून राहू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .सोयाबीन टिकूनदेशातील बाजारात मागील काही दिवसांपासून सोयाबीनला चांगला उठाव आहे. यामुळे सोयाबीनचा भावही टिकून आहे. मार्च महिन्यात सोयाबीन भावात झालेली सुधारणा कायम आहे. सोयाबीनची बाजारातील आवक मात्र घटलेली आहे. सोयाबीनला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळातही बाजारात सोयाबीनची आवक कमी आणि उठाव अधिक राहून दर टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: सोयाबीनला उठाव; कापूस दरात सुधारणा, कांदा आवक सुधारली, कारली तसेच बाजरीचेही दर टिकून .काकडीला उठावराज्यातील बाजारात काकडीला चांगला उठाव मिळत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे काकडीलाही उठाव आहे. तर मागील आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाचा आणि गारपीटीचा काही भागातील काकडी पिकाला फटका बसल्याचे शेतकरी सागंत आहेत. सध्या बाजारात काकडीला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १४०० रुपये भाव मिळत आहे. काकडीला पुढील काळातही उठाव चांगला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला आधार राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. .Agrowon Podcast: मक्याचा भाव दबावातच; सोयाबीनमध्ये वाढ, कापसाला उठाव, गवार तेजीत, तर गव्हाची आवक वाढली .मका स्थिरावलादेशातील बाजारात मागील काही आठवड्यांपासून मक्याचा भाव स्थिरावला आहे. मक्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. तर दुसरीकडे मक्याचा उठाव काहिसा स्थिरावला आहे. मक्याला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १६०० ते १९०० रुपये भाव मिळत आहे. मक्याची बाजारातील आवक पुढील काळात कायम राहण्याची शक्यता आहे. तर मक्याचा उठाव मात्र मर्यादीतच राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .गवार तेजीतराज्यातील बाजारात गवारचा भाव टिकून आहे. गवारची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून स्थिरावली आहे. गवारला मागील वर्षभर कमी आवकेमुळे चांगला भाव मिळत आहे. सध्या अनेक भागात गवारची लागवड कमी असल्याचे दिसते. त्यामुळे आवक कमी आहे. सध्या गवारला प्रतिक्विंटल ५ हजार ते ७ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. गवारची आवक पुढील काळातही कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गवारचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज बाजारातील व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.