Family's Economy
Family's EconomyAgrowon

Family's Economy : कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी काही पथ्ये पाळणे आवश्यक

अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक व्याजदर अजून वाढवणार आहे; म्हणून मग रिझर्व्ह बँकेला देखील व्याजदर वाढवावे लागणार आहेत. अमेरिकेत व्याजदर वाढल्याने डॉलर अजून तगडा होऊन रुपया आणखी कमकुवत होणार.

ताप का वाढतोय याचे डॉक्टरनी निदान केल्यानंतर ते म्हणतात, की हे औषध घ्या, ताप उतरेल. आणि त्या औषधाचे बरेच डोस घेतल्यानंतर ताप उतरण्याऐवजी वाढत असल्यावर तुमची काय अवस्था होईल? तशीच परिस्थिती येऊ घातली आहे. महागाईचा ताप उतरवण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत व्याजदराचे पॅरासिटोमॉल पाजत आहे; पण महागाईचा ताप काही कमी होत नाहीये. महागाई निर्देशांक सतत वाढतो आहे. व्याजदर वाढते राहिल्यामुळे उत्पादन खर्च वाढले आहेत, म्हणून पुन्हा महागाई वाढत आहे

Family's Economy
Cotton Rate : उत्तर भारतातील कापूस उत्पादनात घट

अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक व्याजदर अजून वाढवणार आहे; म्हणून मग रिझर्व्ह बँकेला देखील व्याजदर वाढवावे लागणार आहेत. अमेरिकेत व्याजदर वाढल्याने डॉलर अजून तगडा होऊन रुपया आणखी कमकुवत होणार. इंधन खर्च वाढणार असल्यामुळे महागाई पुन्हा वाढू शकते.

Family's Economy
Soybean Theft : खोडदला मळणी केलेल्या सोयाबीनवर चोरट्यांचा डल्ला

औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक (आयआयपी) अनेक महिन्यांनी निगेटिव्ह झोनमध्ये आला आहे. जागतिक मंदी आली, की भारताची निर्यात कमी होणार. भारताचा परकीय चलनाचा साठा रोडावत आहे. वरील साऱ्या गोष्टी काही काल्पनिक भयकथा नाहीत, तर त्या आपल्या दारांवर पडणाऱ्या थापा आहेत.

देशाची अर्थव्यवस्था मॅनेज करायला बरेच पंडित लोक असतात; ते बघतील काय करायचे ते. पण आपल्या घराची, कुटुंबाची अर्थव्यवस्था तुम्हाला स्वतःला मॅनेज करायची असते. ती कशी करायची यावर नवरा-बायको, मित्र यांच्यात चर्चा करा.

यासंदर्भात काही मित्रत्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे ः

- महागाईमुळे तुमच्या मासिक आमदनीतून अधिक कॅश बाहेर जाणार.

- व्याजदर वाढल्यामुळे ईएमआय वाढणार, पुन्हा अधिक कॅश बाहेर जाणार.

- उलट बाजूला, आर्थिक मंदीमुळे मुदलात तुमची आमदनी कमी होऊ शकते. म्हणजे तुमची डबल ढोलकी होऊ शकते.

- सर्व अनावश्यक खर्च पुढे ढकला. सोने, दागिने, नवीन कपडे, वाहने, गृहोपयोगी वस्तू ते अमेझॉनपासून सगळीकडे तुम्हाला भरघोस डिस्काउंट मिळणार. परंतु माल स्वस्तात मिळतोय म्हणून घेऊ नका; तर माल हवाच असेल तरच घ्या.

- देशाचा जीडीपी वाढवण्याची जवाबदारी तुमची नाही, एवढे लक्षात ठेवा.

- कोणत्याही आवश्यक खर्चाला कात्री लावायला लागणार नाही हे बघा. विशेषतः पौष्टिक खाण्यावरचा खर्च, मुले असतील तर त्यांचा आहार, दूध, मांसाहार, फळे, भाज्या, डाळी कितीही महाग झाल्या तरी खाल्ल्याच पाहिजेत, असे पैशाचे नियोजन करा.

- मुलांच्या शिक्षणात खंड पडणार नाही, याची तजवीज करा.

- घरात कोणी आजारी असेल तर त्यांच्यावरचे उपचार पुढे ढकलू नका.

- पैसे उरतील तर बचत करा, जेवढी करता येईल तेवढी करा.

- परतावा / व्याज जास्त मिळण्याच्या मोहाने पॉन्झी स्कीम, चिट फंड, शेअर्स यांच्यात बचती बिलकुल गुंतवू नका.

- कर्जाचा महापूर आलाय. ऑनलाइन, ऑफलाइन कर्जाचा भडिमार सुरू आहे. पण शक्यतो कर्ज काढणे टाळा. स्वस्तात आणि घरपोच मिळतंय म्हणून कर्जे काढू नका.

- मनःस्वास्थ्य सांभाळा. आपल्या कुटुंबीयांबरोबर राहा. मित्र, शेजारी यांना हवे-नको ते विचारा.

जागतिकच नव्हे तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील, बरेच जण सावधानतेचा इशारा देत आहेत. तो गांभीर्याने घ्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com