Vegetables Rate
Vegetables RateAgrowon

Vegetables Rate : नगरला भाजीपाला, फळांच्या दरात सुधारणा कायम, आवकेत मात्र घट

नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत असते. मात्र पावसामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून आवकेत मोठी घट झालेली आहे.

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dada Patil Shalke APMC) मागील आठवड्यात भाजीपाला, फळांच्या दरात सुधारणा कायम होती. पावसामुळे मात्र भाजीपाल्याची आवक (Vegetables Intake) कमीच होती. नगर येथील बाजार समितीत दर दिवसाला दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत असते. मात्र पावसामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून आवकेत मोठी घट झालेली आहे.

Vegetables Rate
Crop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले

मागील आठवड्यात दर दिवसाला सहाशे क्विंटलपर्यंत आवक झाली. आवक कमी व मागणी अधिक असल्याने दरात सुधारणा कायम होती. टोमॅटोची ५३ क्विंटलची दर दिवसाला आवक होऊन १ हजार ते ३ हजार रुपये प्रती टन दर मिळाला. वांगीची १८ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते चार हजार, फ्लॉवरची २९ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार, कोबीची १५ क्विंटलची आवक होऊन पाचशे ते दीड हजार रुपये, काकडीची १८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, गवारची २ क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ८ हजार, घोसाळ्याची २ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ३ हजार, दोडक्याची ४ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ४ हजार,

कारल्याची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ४ हजार, भेंडीची २५ क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते २ हजार, वाल शेंगाची दोन क्विंटलपर्यंत आवक होऊन ४ हजार ते ६ हजारापर्यंत दर मिळाला. घेवड्याची २ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ४ हजार, बटाट्याची १८० क्विंटलपर्यंत आवक होऊन १७०० ते २३००, हिरव्या मिरचीची ४९ क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ४ हजार, शेवग्याची ७ क्विंटलपर्यंत आवक होऊन २५०० ते ७ हजार, शिमला मिरचीची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ४ हजाराचा दर मिळाला. शेपू, मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू आदी भाज्यांना मागणी होती, मात्र आवक नेहमीच्या तुलनेत निम्म्याने कमी झाली होती.

फळांची तीनशे क्विंटल आवक

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांची मागील आठवड्यात दररोज तीनशे ते साडेतीनशे क्विंटलची आवक झाली. मोसंबीची ११० क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. संत्राची ८७ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ५ हजार, डाळिंबाची १७ क्विंटलपर्यंत आवक होऊन १ हजार ते पंधरा हजार, पपईची १८ क्विंटलची आवक होऊन ५०० ते ३ हजार, सीताफळाची ४० क्विंटलपर्यंत आवक होऊन २ हजार ते ६ हजार, पेरूची १० क्विंटलपर्यंत आवक होऊन ५०० ते ४ हजाराचा दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com