Soybean Market Rate : सोयाबीन भावाचा प्रश्न गंभीर वळणार; भारतीय शेतकऱ्यांना इतर देशांच्या तुलनेत हेक्टरी उत्पन्न कमी 

Market Update : सोयाबीन भावाचा प्रश्न सध्या गंभीर वळणार पोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातच सोयाबीनच्या भावात मंदी आली.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

Pune News : सोयाबीन भावाचा प्रश्न सध्या गंभीर वळणार पोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातच सोयाबीनच्या भावात मंदी आली. पण भारतात सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत तीनपटीने कमी आहे. त्यामुळे या देशातील शेतकऱ्यांना भाव कमी मिळाला तरी हेक्टरी उत्पादन भारतीय शेतकऱ्यांपेक्षा जास्त मिळते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनचा भाव गेल्या चार वर्षातील निचांकी पातळीवर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला ९.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान भाव मिळत आहे. रुपयात हा भाव ३ हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. तर भारतात सध्या सोयाबीनला भाव ४ हजारांच्या दरम्यान मिळत आहे. म्हणजेच सध्या सोयाबीनचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारातील भावापेक्षा जास्त दिसत असला तरी हेक्टरी उत्पन्नाचा विचार करता भारतीय शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न कमी आहे. 

Soybean
Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदान यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे गायब

अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांना सोयाबीनचे एकरी उत्पादन भारताच्या शेतकऱ्यांच्या तुलनेत तीनपटीने जास्त मिळते. अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांना हेक्टरी जवळपास ३५ क्विंटल सोयाबीन उत्पादन मिळते. म्हझणेच साडेतीन टन. तर भारतातील शेतकऱ्यांनी हेक्टरी उत्पादन १० क्विंटल म्हणजेच एक टन मिळते. 

हेक्टरी उत्पादकता जास्त असल्याने अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांना थोडा कमी भाव मिळाला तरी आपल्या शेतकऱ्यांपेक्षा हेक्टरी उत्पन्न जास्त मिळते. भारतात सध्या सोयाबीनचा भाव ४ हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. तर हेक्टरी उत्पादन १० क्विंटल जरी पडकलं तरी आपल्या शेतकऱ्यांना हेक्टरी उत्पन्न ४० हजार रुपये मिळेल. 

Soybean
Soybean Market Rate : सोयाबीनच्या भावातील पडझड थांबवा; नवीन माल बाजारात येण्याआधी उपाययोजना करा : किसान सभेची मागणी

अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांचे हेक्टरी उत्पादन आपल्या शेतकऱ्यांपेक्षा तीन ते साडेतीन पटीने जास्त आहे. सरासरी उत्पादकता ३५ क्विंटल आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव ९.५५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आहेत. रुपयात हा भाव जवळपास ३ हजार रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच अमेरिका आणि ब्राझीलमधील शेतकऱ्यांना एका हेक्टरमधून १ लाख ५ हजार रुपये उत्पन्न मिळते. 

जागतिक पातळीवर जीएम सोयाबीनची लागवड जास्त प्रमाणात होते. तर भारतात नाॅन जीएम लागवड होते. नाॅन जीएम असले तरी भारतीय सोयाबीन अपेक्षित असा जास्त भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com