Cotton : कापूस निर्यातदर ही ओळख पुसली जाणार?

देशात उत्पादन कमी राहून आयात वाढण्याची शक्यता
Cotton Export
Cotton ExportAgrowon
Published on
Updated on

पुणेः कापूस निर्यातदार (Cotton Exporter) देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र २०२१-२२ मध्ये निचांकी कापूस उत्पादन (Cotton Production) झालं. त्यातच कापसाची मागणी (Cotton Demand) वाढली. त्यामुळं आयात (Cotton Import) करावी लागतेय. परिणामी भारत पुढील हंगामात कापूस आयातदार (Cotton Importer) होण्याच्या मार्गावर आहे, असा दावा केला जात आहे.

कापूस हे खरिपातील महत्वाचं पीक आहे. आत्तापर्यंत भात आणि सोयाबीननंतर कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. आत्तापर्यंत निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र मागील काही वर्षांपासून देशातील कापूस उत्पादन घटतंय. तर दुसरीकडे कापड उद्योगाची क्षमता वाढतेय. त्यामुळं कापूस वापर वाढलाय. पण उत्पादन कमी राहिल्यानं आयात करावी लागतेय.

Cotton Export
Cotton : कापूस आयात कापड उद्योगाच्या अंगलट का आली?

चालू हंगामात मागील पाच वर्षात बिकट स्थिती निर्माण झाली. देशातील कापूस उत्पादन २० टक्क्यांनी घटलं, मात्र वापर ३० टक्क्यांनी वाढला. प्रतिकूल हवामान आणि कीड-रोगांमुळं देशातील कापूस उत्पादन कमी राहीलं. त्यातच मागील वर्षातील शिल्लक साठा पाच वर्षांतील सरासरीपेक्षा कमी होता, असं काॅटन गुरुचे व्यवस्थापकीय संचालक मनीष डागा यांनी सांगितलं.

भारतात गरजेपेक्षा अधिक कापूस उत्पादन होत होतं. पण मागील काही वर्षांपासून स्थिती बदलली. देशातील कापूस उत्पादन आणि उत्पादकता वाढली नाही. मात्र वापर वाढतोय. त्यामुळं भारतावर ही वेळ आल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव यु.पी. सिंह यांनी सांगितले.

Cotton Export
Cotton PA 837: देशी कापसाचा नवीन सरळ वाण

पण वाणिज्य मंत्रालयानं देशात यंदा जवळपास ४० लाख गाठी कापूस अतिरिक्त असल्याचं म्हटलंय. मागील हंगामातील ७१.८१ लाख गाठी कापूस शिल्लक होता. तर उत्पादन ३१५.४३ लाख गाठी झालं. म्हणजेच केवळ देशातीलच कापूस पुरवठा ३८७.२७ लाख गाठी झाला. भारतानं यंदा ४२ लाख गाठींची निर्यात केली. तर आयात १५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. त्यापैकी ३२१ लाख गाठी कापूस वापर होईल. त्यानंतरही ३९.२७ लाख गाठी कापूस देशात शिल्लक राहील, असं वाणिज्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. म्हणजेच देशात उद्योगांना पर्याप्त कापूस असेल.

मागील पाच वर्षात कापड उद्योगाकडून वापर होणारा ९० टक्के कापूस देशातच पीकतो. केवळ ५ ते १० टक्के कापसाची आयात केली जाते. आयात कापूस हा अतिरिक्त लांब धाग्याचा असतो. या कापसाची इजिप्त, सुदान, अमेरिका आदी देशांतून आयात होते, असंही वाणिज्य मंत्रालयानं स्पष्ट केलं.

म्हणजेच काय तर भारतातील घटतं कापूस उत्पादन केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर उद्योगासाठीही डोकेदुखी ठरतंय. कापूस आयात ही उद्योगासाठीही आत्मघाती ठरतेय, याचा अनुभव कापड उद्योग घेतच आहे. देशातील कापूस उत्पादन वाढलं तरचं शेतकरी आणि कापड उद्योगासाठीही फायद्याचं ठरेल.

देशात चालू हंगामात कापूस उत्पादन घटलं. उत्पादन ३१५ लाख गाठींवर स्थिरावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वापर मात्र ३४५ लाख गाठींवर पोचला. त्यामुळं यंदा भारत १५ लाख गाठी कापूस आयात करण्याची शक्यता आहे.
मनीष डागा, व्यवस्थापकीय संचालक, काॅटन गुरु
भारतात ५० ते ६० लाख गाठी कापसाचा अतिरिक्त साठा असतो. मात्र तो आता घटत आहे. यंदा अतिरिक्त साठा निचांकी पातळीवर पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळं भारताला आयात वाढवावी लागेल
यु.पी. सिंह, सचिव, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com