Vegetable Rate : भाज्यांचे आवक अल्पच, दरातही चढउतार

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १९ ते २४ सप्टेंबर दरम्यान कारलीची केवळ ४३ क्विंटल आवक झाली.
Vegetable Market
Vegetable MarketAgrowon

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार (Aurangabad APMC) समितीमध्ये गत आठवडाभरात कारली, दुधी भोपळा, वांगी, कोबी, ढोबळी मिरची, आले, हिरवी मिरची, भेंडी आदी भाज्यांची आवक (Vegetable Arrival) अल्पच राहिली. दुसरीकडे भाज्यांच्या आवकेत व दरातही (Vegetable Rate) चढ उतारा पाहायला मिळाला.

Vegetable Market
Wild Vegetable : आरोग्यदायी सुरण, पाथरी, तांदुळजा

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १९ ते २४ सप्टेंबर दरम्यान कारलीची केवळ ४३ क्विंटल आवक झाली. ५ ते १४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या कारल्याला २६०० ते ३४०० प्रतिक्विंटल दरम्यान सरासरी दर मिळाला. दुधी भोपळ्याची एकूण आवक ४३ क्विंटल झाली ६ ते २० क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या दुधी भोपळ्याला सरासरी १२५० ते १७५० प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

Vegetable Market
Vegetable Market Rate : सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर

वांगीची आवक केवळ तीन वेळा झाली. ६३ क्विंटल एकूण आवक झालेल्या वांगीला सरासरी ८०० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला. कोबीची एकूण आवक १४७ क्विंटल झाली. ४० ते ६४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या कोबीचे सरासरी दर १३०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले. ढोबळी मिरचीची चार वेळा मिळून केवळ ६८ क्विंटल आवक झाली. १२ ते २४ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीचा सरासरी दर २२५० ते २७५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिला. आल्याची तीन वेळा मिळून केवळ ७३ क्विंटल आवक झाली.

२० ते ३१ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या या आल्याला सरासरी १६०० ते २७५० रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला. हिरव्या मिरचीची एकूण आवक २०१ क्विंटल झाली. ४६ ते ८८ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या हिरव्या मिरचीला सरासरी २३०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान दर मिळाला.

भेंडीची एकूण आवक ८९ क्विंटल झाली. १७ ते २९ क्विंटल दरम्यान कमी अधिक प्रमाणात आवक झालेल्या भेंडीचे सरासरी दर २००० ते ३००० रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहिल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com