Sugar production: देशातील साखर उत्पादन घटणार, निर्यातीवर काय परिणाम होईल?

देशातील प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे उसाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन घटेल, असे साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

देशातील साखर उत्पादनात (Sugar Prodction) यंदा घट होणार आहे. २०२२-२३ या हंगामात देशात ३४३ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. आधीच्या अंदाजापेक्षा हे उत्पादन चार टक्क्यांनी कमी आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

देशातील प्रमुख ऊस उत्पादक (Sugarcane Producer) राज्यांमध्ये प्रतिकूल हवामानामुळे उसाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन घटेल, असे साखर उद्योगाच्या (Sugar Industry) प्रतिनिधींनी सांगितले.

‘‘ सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिरिक्त पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे उसाची कायिक वाढ कमी झाली. गेल्या वर्षीपेक्षा उसाचे उत्पादन कमी राहिले,'' असे राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले.

भारत साखर उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर तर साखर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या हंगामात देशात विक्रमी ३५९ लाख टन साखर उत्पादन झाले होते.

Sugar Production
Sugar Rate : साखरेच्या मागणी, दरातही विशेष वाढ नाही

राॅयटर्स वृत्तसंस्थेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील साखर उत्पादन यंदा ७ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज व्यक्त केला होता.

महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादन घटणार असल्याने देशाचे साखर उत्पादन ३३३ लाख टनावर येण्याची शक्यता या बातमीत वर्तवण्यात आली होती. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय साखर बाजारात खळबळ उडाली.

Sugar Production
Sugar Export : प्रीमियमपोटी तब्‍बल ९०० कोटी रुपये उत्तरेकडील राज्यांना

त्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा सव्वादोन लाख टनाने साखर उत्पादन कमी राहील,

यंदा अपेक्षित साखर उत्पादन ३५७ लाख टन राहील, असे महासंघाने म्हटले होते. परंतु महासंघाने आता या अंदाजातही घट केली आहे. यंदा साखर उत्पादन ३४३ लाख टन राहील, असे आता महासंघाने स्पष्ट केले आहे.

यंदा देशातील साखर उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंंदाज साखर उद्योगाने सुरूवातीला व्यक्त केला होता. केंद्र सरकारनेही अतिरिक्त साखर उत्पादन गृहित धरून निर्यातीचे धोरण आखले.

परंतु आता साखर उत्पादन कमी होणार असल्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीला परवानगी मिळणार का, मिळाली तरी त्याचे प्रमाण कमी राहील का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com