Sugar Production : साखर उत्पादन १२ लाख टनांनी घटले

यंदाच्या हंगामात मार्चअखेर देशातील ३३८ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. या कालावधीत कारखान्यांनी २९९ लाख टन साखर तयार केली आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Sugar Production News : यंदाच्या हंगामात मार्चअखेर देशातील ३३८ साखर कारखान्यांचा हंगाम (Sugar Season) आटोपला आहे. या कालावधीत कारखान्यांनी २९९ लाख टन साखर तयार (Sugar Production) केली आहे. अद्याप १९४ साखर कारखाने सुरू आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांचा हंगाम संपत आल्याने देशातही साखर उत्पादन कमी प्रमाणात होत आहे.

महाराष्ट्र गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ लाख टनांनी पिछाडला आहे. तर उत्तर प्रदेशात गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात २ लाख टनांनी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात ८९ लाख टन साखर तयार झाली आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्रातील साखर कारखाने जूनपर्यंत चालले होते. यंदा मात्र मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच कारखाने बंद होण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी या कालावधीत ३६६ कारखाने सुरू होते. यंदा ही संख्या १९४ वर आली आहे.

Sugar Production
Sugar Production : कोल्हापूर विभाग साखर उत्पादनात राज्यात अव्वल

गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १७२ कारखाने यंदा लवकर बंद झाले आहेत. याचा फटका साहजिकच साखर उत्पादनाला बसला आहे.

१९४ कारखान्यांमध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशमधील ९७ कारखाने, तमिळनाडूमधील २४ कारखाने, हरियानामधील १४ कारखाने, गुजरातमधील १०, तर महाराष्ट्रातील ३० कारखान्यांतील गाळप सध्या सुरू आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२३ अखेर देशातील नवे साखर उत्पादन २९८.७० लाख टन इतके झाले आहे. ते गतवर्षीच्या या तारखेच्या साखर उत्पादनापेक्षा साडेबारा लाख टनांनी कमी आहे.

Sugar Production
Sugar Production : अंतिम टप्प्यातील साखरनिर्मिती मंदावली

यंदा या कालावाधीत ३०३० लाख टनांचे ऊसगाळप झाले. ते गतवर्षीच्या या तारखेच्या गाळपापेक्षा ६९ लाख टनांनी कमी आहे. सरासरी साखर उतारादेखील ९.८७ टक्के असून, जो गेल्या वर्षीच्या मार्चअखेर आलेल्या सरासरी साखर उताऱ्यापेक्षा ०.१८ टक्क्याने कमी आहे.

या सगळ्याचे फलस्वरूप देशपातळीवरील हंगामाअखेर होणारे साखर उत्पादन सुमारे ३२५ लाख टन इतके मर्यादित होण्याचा अंदाज आहे. यंदाचे उत्पादन गतवर्षीच्या ३५९.२५ लाख टनांपेक्षा जवळपास ३५ लाख टनांनी कमी राहण्याचा अंदाज आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देशपातळीवरील ऊस उत्पादक राज्यांमधील कारखानानिहाय ऊस लागवड व खोडव्याची आकडेवारी जमा करण्यात येत आहे. त्याचे विश्‍लेषण केल्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या अपेक्षित ऊसगाळपाचा आणि साखर उत्पादनाचा अंदाज महासंघातर्फे व्यक्त करण्यात येईल.
- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
सध्याची आकडेवारी पाहता स्थानिक बाजारातील साखरेचे दर समाधानकारक पातळीवर राहतील. यंदा असणाऱ्या अपेक्षित दाहक उन्हाळ्यात शीत पेये, आइस्क्रीम इत्यादी उत्पादनासाठी साखरेचा अतिरिक्त वापर होणे अपेक्षित आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com