Brazil Sugar Production : ब्राझीलमध्ये साखर उत्पादनात वाढ कायम

Sugar Industry : जागतिक बाजारात साखर उत्पादनात दबदबा असणाऱ्या ब्राझीलमध्ये सुरू असलेल्‍या गळीत हंगामास पोषक हवामान निर्माण झाल्याने उसाच्या गाळपासह साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : जागतिक बाजारात साखर उत्पादनात दबदबा असणाऱ्या ब्राझीलमध्ये सुरू असलेल्‍या गळीत हंगामास पोषक हवामान निर्माण झाल्याने उसाच्या गाळपासह साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. विविध संस्‍थांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.

यंदाचा हंगाम संपेपर्यंत उसाचे गाळप ६०६ लाख टन होईल तर साखरेचे उत्पादन ३९० लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे ‘डेटाग्रो’ या संस्थेने केलेल्या पीक सर्व्हेक्षणानंतर हा अंदाज केला आहे.

‘युनिका’ या संस्‍थेने दिलेल्या माहितीनुसार ब्राझीलमधील साखर उत्पादन जूनमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३२ टक्के वाढले आहे. हीच वाढ हंगाम संपेपर्यंत कायम राहू शकते, असा अंदाज या संस्‍थेचा आहे. मे महिन्‍यात चांगला पाऊस झाल्‍याने उसाच्या रिकव्हरीत वाढ आहे.

ब्राझीलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी जागतिक बाजारात साखरेची टंचाई निर्माण होईल असा अंदाज होता. भारतासारख्या गेल्या वर्षी अग्रगण्य असणाऱ्या देशात २०२२-२३ या वर्षात साखर उत्पादनात घट झाली. तर ब्राझीलमध्ये दोन वर्षांपूर्वी दुष्‍काळ सदृश वातावरण राहिल्याने एकूणच साखर उत्पादन वाढेल असे कोणीही ठोस सांगू शकत नव्हते.

Sugar Production
Sugar Production : एल निनो असतानाही भारतातील साखर उत्पादन वाढणार?

ब्राझीलमध्ये साखर हंगामास एप्रिलमध्ये सुरुवात झाली आणि एक महिन्यानंतर साखर उत्पादन वाढीची चर्चा सुरू झाली. तेथील साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या दोन महिन्यांच्या उस हंगामाचा अभ्यास करून अनेक संस्‍थांनी यंदा साखर उत्पादन वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात केली.

तेथील हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनीही येथून पुढील काळातही उस हंगामासाठी चांगले हवामान राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ब्राझीलमध्ये २०२०-२१ मध्ये ३८० लाख टन साखर उत्पादन झाले होते. हा उत्पादनाचा आकडा यंदा पार होऊन तो ३९० लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.

Sugar Production
Sugar Production : साखर उत्पादनात उत्तर प्रदेश बनला नंबर वन

आंतरराष्‍ट्रीय दरात काहीशी घसरण

गेल्या वर्षभरात आंतरराष्‍ट्रीय बाजारात साखरेचे दर सातत्याने उच्चांकी पातळीवर राहिले. लंडन व न्‍यूयार्क बाजारात मोठी तेजी पहावयास मिळाली. अगदी ७०२ डॉलर प्रतिटनापर्यंत दराने उसळी मारली. साधारणतः जूनच्या मध्यापर्यंत ही स्थिती होती. पण ब्राझीलचे उत्पादन वाढण्याची शक्यता वाढल्यानंतर ही तेजी काहीशी कमी होण्यास प्रारंभ झाला.

सध्या दर ६२९ डॉलरपर्यंत खाली आहेत. दर एकदम कमी झाले नसले तरी साखर उत्पादन वाढीचा अंदाज दर घसरणीस कारणीभूत ठरत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. दर नरमले असले तरी दोन वर्षांच्या तुलनेत ते समाधानकारक आहेत. यामुळे याचा फायदा ब्राझीलच्या साखर कारखानदारांना निश्चित होईल, असे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com