
Pune News : राज्यात चालू गाळप हंगामात साखर कारखान्यांकडून १०२ लाख टनापर्यंत साखरेचे उत्पादन होण्याच्या अंदाज ‘विस्मा’ने व्यक्त केला आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची (विस्मा) बैठक नुकतीच बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असता साखर उत्पादनाचे सुधारित अंदाज घोषित करण्यात आले.
१५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील ९४ सहकारी व ९२ खासगी साखर कारखान्यांनी २३३ लाख टन ऊस गळप करीत १९ लाख टनाच्या पुढे साखर उत्पादन केले आहे. ‘विस्मा’च्या म्हणण्यानुसार राज्यातील सरासरी साखर उताऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर उत्पादन १०० ते १०२ लाख टनाच्या आसपास राहू शकते. यातील १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळवली जाण्याची शक्यता असून त्यामुळे राज्याचे निव्वळ साखर उत्पादन ८० लाख टनाच्या आसपास होईल, असे ‘विस्मा’चे म्हणणे आहे.
राज्यातील बाजारपेठेत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३३०० ते ३४०० इतके कमी आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढला असून कारखाने तोट्यात असल्यामुळे केंद्र शासनाने साखरेची किमान विक्री किंमत प्रतिक्विंटल ४१०० रुपये करावी अशी मागणीही ‘विस्मा’ने केली आहे.
चालू गाळप वर्ष २०२४-२४ मध्ये उसाच्या रास्त व किफायतशीर दरात वाढ करण्यात आल्यामुळे इथेनॉलच्या उत्पादनात देखील वाढ झालेली आहे. यामुळे केंद्र शासनाने इथेनॉलचे दर प्रति लिटर पाच रुपयांपर्यंत वाढवण्याची आग्रही मागणी ‘विस्मा’च्या बैठकीत करण्यात आली.
‘खासगी कारखान्यांनाप्राधान्य नाही’
देशातील तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदीच्या निविदा काढताना खासगी कारखान्यांकडून उत्पादित होणाऱ्या इथेनॉलसाठी तिसऱ्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम ठेवल्यामुळे ‘विस्मा’ने नाराजी व्यक्त केली आहे. इथेनॉल व साखर उत्पादनातील सध्याच्या जाचक अटी हटविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला, असे ‘विस्मा’चे कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.