Pune News: भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करारानुसार भारत अमेरिकेचे सोयातेल आणि डीडीजीएस आयात करणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून सोयाबीनचे भाव घसरले आहेत. परंतु अजून अंतिम कराराविषयी केवळ संयुक्त मसुदा जाहीर झाला आहे. प्रत्यक्ष करार होऊन त्याचा परिणाम दिसायला काही महिने लागणार आहेत. तरीही व्यापाऱ्यांनी ‘मार्केट सेन्टिमेन्ट'च्या नावाखाली भाव पाडण्याचा उद्योग केल्याचे दिसले. गुरुवारपासून याचा परिणाम कमी होऊन सोयाबीनच्या भावात पुन्हा २०० ते ३०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. .सोयातेल, डीडीजीएस आयात सरसकट होणार नसून त्यासाठी कोटा असणार आहे. तसेच भारतात डीडीजीएसचे भाव अमेरिकेच्या तुलनेत कमीच आहेत. त्यामुळे निर्यातीत पडतळ बसत नसेल तर अमेरिकेतून किती डीडीजीएस भारतात येईल, याबद्दल शंकाच आहे. त्यामुळे बाजारातील मूलभूत घटक लक्षात घेता सोयाबीन भावात झालेली तात्पुरती घसरण थांबून भाव पुन्हा सुधारण्याची शक्यता आहे,.Soybean Rate: व्यापार करारापेक्षा आवक वाढल्याचा बाजारावर जास्त परिणाम .असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. व्यापार करारात भारताने अमेरिकेच्या सोयातेल आणि डीडीजीएसच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. अमेरिकेतील डीडीजीएसची गुणवत्ता चांगली असते. त्यामुळे डीडीजीएसचा वापर वाढून सोयापेंडचा वापर कमी होईल, अशी भीती पसरून बाजारात सोयाबीनचे भाव १० टक्क्यांनी कमी झाले होते. सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल ५ हजार २०० ते ५५०० रुपयांवरून ४ हजार ७०० ते ५ हजारांपर्यंत कमी झाले होते. .प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ९०० रुपयांवरून ५ हजार ४०० रुपयांवर आले आहेत. पण हा तात्पुरता परिणाम असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. सोयाबीनच्या भावात शुक्रवारी (ता.१३) क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीन ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांवर पोचले आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ५०० ते ५ हजार ७०० रुपये झाले आहेत..Soybean MSP: सोयाबीन उत्पादकांची ‘नाफेड’ केंद्राकडे पाठ .‘पॅनिक सेलिंग’ टाळासोयातेल आणि डीडीजीएस आयातीविषयी बातमी जाहीर आल्यानंतर बाजारात ‘पॅनिक सेलिंग'' सुरू झाले आहे. बाजारातील आवक वाढल्याने भाव कमी होत गेले. परंतु करारात मान्यता दिलेली आयात लगेच होणार नाही. यंदा देशातील सोयाबीन उत्पादन कमी आहे. पुरवठाही कमी आहे. त्यामुळे सोयाबीनला चांगला आधार आहे. सोयाबीनच्या दरावर सध्या असलेला दबाव फार काळ टिकणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ‘पॅनिक सेलिंग’ टाळावे, बाजारात अचानक वाढलेली आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता आहे, असेही अभ्यासकांनी सांगितले..सोयातेल आयातीचा कोटाअमेरिकेतील सोयातेल आयातीसाठी कोटा लागू असणार आहे. वर्षाला पाच लाख टनांच्या आसपास हा कोटा असेल. भारताला एरवीही दरवर्षी सोयातेलाची आयात करावीच लागते. भारताने मागील वर्षात जवळपास ५५ लाख टन सोयातेल आयात केले होते. त्यामुळे शुल्कमुक्त आयातीचे प्रमाण १० टक्क्यांच्या दरम्यान राहू शकते. त्याचा सोयाबीनच्या भावावर फारसा परिणाम दिसणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले..‘डीडीजीएस’चे भाव कमीचअमेरिकेतील डीडीजीएस आयातीसाठीही पाच लाख टनांचा कोटा लागू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या देशात डीडीजीएसचे भाव अमेरिकेच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळे देशातून निर्यात होत असल्याचे उद्योगांनी सांगितले. भारतात २२० ते २४० डाॅलर प्रति टन दराने डीडीजीएस उपलब्ध आहे. अमेरिकेचे डीडीजीएस आयात केले तर ३०० डाॅलरच्या दरम्यान भाव पडेल. अमेरिकेच्या डीडीजीएसची गुणवत्ता चांगली असते. पण सध्याच्या भावात आयात फार वाढण्याची शक्यता नाही..बाजारात ‘पॅनिक सेलिंग’ सुरू झाल्यामुळे भाव जास्त घसरले आहेत. जास्त माल आल्यानंतर प्रक्रिया प्लांट्सनी भाव कमी केले आहेत. सोयाबीनला यंदा मंजबुत आधार आहे. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर भावात पुन्हा सुधारणा होईल. भाव पुन्हा ५५०० रुपयांच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे.राजेंद्र जाधव, शेतीमाल बाजार अभ्यासक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.